Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’ने रचला इतिहास; रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘बाहुबली 2’ला टाकलं मागे

| Updated on: Aug 16, 2023 | 9:13 AM

'गदर 2'ची कमाई ज्या गतीने होत आहे, ते पाहून हा चित्रपट लवकरच ब्लॉकबस्टर ठरू शकतो, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे आता फक्त शाहरुखच्या 'पठाण'पासून काही अंकांनी दूर आहेत.

Gadar 2 | सनी देओलच्या गदर 2ने रचला इतिहास; रेकॉर्डब्रेक कमाई करत बाहुबली 2ला टाकलं मागे
Gadar 2 and Bahubali 2
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : हिंदुस्तान जिंदाबाद है.. जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा.. या डायलॉगने पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. तारा सिंग आणि सकिनाच्या अनोख्या लव्हस्टोरीचा एक नवीन टप्पा ‘गदर 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये तीच क्रेझ पहायला मिळतेय. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी सर्वांत जास्त कमाई करणारा आणि सर्वांत जास्त पाहिला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होते.

स्वातंत्र्यदिनी बनवला रेकॉर्ड

‘गदर 2’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने 55.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात तब्बल 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये पाचव्या दिवसाची कमाई सर्वांत जास्त आहे.

बाहुबली आणि सुलतानला टाकलं मागे

कमाईच्या या दमदार आकड्यांसह सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ने प्रभासच्या बाहुबली 2, सलमान खानच्या सुलतान आणि हृतिक रोशनच्या वॉर या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. पाचव्या दिवशी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘गदर 2’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ने 58.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.

हे सुद्धा वाचा

सनी देओलचा ‘गदर 2’ ठरणार ब्लॉकबस्टर

‘गदर 2’ची कमाई ज्या गतीने होत आहे, ते पाहून हा चित्रपट लवकरच ब्लॉकबस्टर ठरू शकतो, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे आता फक्त शाहरुखच्या ‘पठाण’पासून काही अंकांनी दूर आहेत. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘गदर 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘गदर 2’ची सोमवारपर्यंतची कमाई

शुक्रवार- 40.10 कोटी रुपये
शनिवार- 43.08 कोटी रुपये
रविवार- 51.70 कोटी रुपये
एकूण- 173.58 कोटी रुपये