Border 2 | ‘बॉर्डर 2’साठी सनी देओल याने घेतली तब्बल इतके कोटी फिस, अभिनेत्याचा खुलासा

| Updated on: Oct 15, 2023 | 8:25 AM

सनी देओल याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. चाहत्यांनी या चित्रपटाला मोठे प्रेम दिले. सनी देओल गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला.

Border 2 | बॉर्डर 2साठी सनी देओल याने घेतली तब्बल इतके कोटी फिस, अभिनेत्याचा खुलासा
Follow us on

मुंबई : सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 (Gadar 2) मध्ये सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेल (Ameesha Patel) ही मुख्य भूमिकेत दिसली. गदर 2 चित्रपटाने तगडी कमाई करत अनेक रेकाॅर्ड तयार केले. मुळात म्हणजे चाहत्यांमध्ये गदर 2 चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करण्यात आले. गदर 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तब्बल 600 कोटींची कमाई करत जबरदस्त अशी कामगिरी नक्कीच केलीये.

गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल हा काही दिवस आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसला. इतकेच नाही तर वडील धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल विदेशात गेला. यावेळी वडिलांसोबतचे काही खास फोटो हे सनी देओल याने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये सनी देओल आणि धर्मेंद्र हे पिझ्झा खाताना दिसले.

गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे देखील सनी देओल याच्याकडून आयोजन करण्यात आले. या पार्टीला बाॅलिवूड कलाकार हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले. गदर 2 नंतर सनी देओल याच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर असल्याची चर्चा आहे.

आता नुकताच सनी देओल याच्या बॉर्डर 2 चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले. बॉर्डर 2 चित्रपटाची शूटिंग लवकरच केली जाणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. इतकेच नाही तर बॉर्डर 2 चित्रपटासाठी सनी देओल याने तब्बल 50 कोटी फिस घेतलीये, अशी चर्चा आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या कमाईमध्येही सनीचा काही हिस्सा असणार आहे.

नुकताच याबद्दल सनी देओल याला देखील विचारण्यात आले. सनी देओल हा म्हणाला की, गदर 2 चित्रपटाच्या अगोदरपासूनच बॉर्डर 2 चित्रपटाचे काम सुरू आहे. 2015 लाच ठरले होते बॉर्डर 2 बद्दल. मात्र, मध्यंतरी माझे काही चित्रपट फ्लाॅप गेले आणि निर्मात्यांनी त्यावर फार विचार केला नाही. खरोखरच तो चित्रपट जबरदस्त असल्याचे सांगताना सनी देओल दिसला. पुढे सनी म्हणाला, बॉर्डर 2 मध्ये मोठे बदल आणि बऱ्याच गोष्टी यावेळी वेगळ्या दिसणार आहेत.