मुंबई | अभिनेता सनी देओल गेल्या काही दिवसांपासून ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचं टीझर प्रदर्शित झालं आहे. अशात सिनेमाच्या टीझरचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलर आणि सिनेमाबद्दल असलेली चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘गदर २’ सिनेमासोबतच अभिनेत्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आहे. सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याच्या घरी लेकाच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु आहेत. सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच लहानपणीची मैत्रीण दृशा आचर्य हिच्यासोबत लग्न करणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा सुरु आहे.
करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा रोका सोहळा १२ जून रोजी पार पडला. या सोहळ्यात देओल कुटुंबाव्यतिरिक्त इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. सोहळा सुरु असताना सनीने जमलेल्या सर्वांसोबत संवाद साधला. तेव्हा सनी देओल आणि बॉबी देओल यांनी जमलेल्या सर्वांसोबत संवाद साधला. तेव्हा अभिनेत्याने सर्वांना जेवणाचं आवाहन केलं…
एवढंच नाही, आणखी काय हवंय विचारत सनीने दारू हवी आहे का? असं देखील सर्वांना विचारलं. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. दारूची ऑफर अभिनेत्याने दुसऱ्या कोणाला नाही तर, चक्क पापाराझींना दिली…. सध्या सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..
सनी, बॉबी आणि अभय देओलच्या चाहत्यांना या व्हिडिओला पसंती मिळत आहे. व्हिडीओवर कमेंट करत चाहते करणच्या लग्नाआधी सनी देओलच्या जुहूच्या बंगल्यावर लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. रोका सोहळ्याला फक्त जवळचे मित्र आणि कलाकारांचे कुटुंबीयच उपस्थित होते. सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे.
शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानप्रमाणे सेट तयार करण्यात आला. गदर २ मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये तब्बल 50 दिवस शूटिंग करण्यात आली.