Gadar 2 | ‘गदर 2’मधील सनी देओलच्या ऑनस्क्रीन सुनेवर प्रेक्षक नाराज; बी ग्रेड चित्रपटांचं कनेक्शन

| Updated on: Jul 24, 2023 | 1:07 PM

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gadar 2 | गदर 2मधील सनी देओलच्या ऑनस्क्रीन सुनेवर प्रेक्षक नाराज; बी ग्रेड चित्रपटांचं कनेक्शन
Simratt Kaur in Gadar 2
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 24 जुलै 2023 : दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल ही जोडी तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येत आहे. मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील एका अभिनेत्रीवर नेटकरी नाराज झाले आहे. या अभिनेत्रीचं नाव सिमरत कौर असं असून तिने चित्रपटात सनी देओलच्या सुनेची भूमिका साकारली आहे. यामागचं कारण म्हणजे सिमरतने याआधी तिच्या करिअरमध्ये काही बी-ग्रेड चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स साकारले आहेत.

सोशल मीडियावर सिमरतचे जुने फोटो पोस्ट करत नेटकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ‘आम्ही सनी देओल आणि अमीषा यांचे चाहते आहोत. मात्र चित्रपटात त्यांच्या सुनेची भूमिका साकारणाऱ्या सिमरतवर आमचा खूप राग आहे. तिने याआधी अत्यंत वाईट चित्रपटांमध्ये काम केलंय. मग आता अनिल शर्मा त्यांच्या इतक्या मोठ्या चित्रपटात तिला भूमिका कशी देऊ शकतात’, असा सवाल एकाने केला. तर अनेकांनी चित्रपटातून सिमरतला काढून टाकण्याची विनंती केली. या वादादरम्यान अमीषाने सिमरतचा सोशल मीडियावर बचाव केला.

हे सुद्धा वाचा

‘माझ्या प्रिय चाहत्यांनो, कृपया तिला ट्रोल करणं बंद करा. तुम्हा सर्वांना विनंती आहे की 11 ऑगस्ट रोजी तुम्ही थिएटरमध्ये हा चित्रपट पहा आणि त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करा’, असं अमीषाने लिहिलं. आणखी एका ट्विटमध्ये अमीषाने लिहिलं, ‘गदर 2 मध्ये उत्कर्षसोबत भूमिका साकारलेल्या सिमरत कौरविरोधात नकारात्मक टिप्पण्यांना उत्तर देत आजची संपूर्ण संध्याकाळ घालवली. एक महिलेच्या नात्याने मी तुम्हाला विनंती करते फक्त सकारात्मकता पसरवा आणि तिला ट्रोल करू नको. नवीन प्रतिभेला आपण प्रोत्साहन देऊयात.’

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनीच केलंय. विशेष म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत. सनी देओल आणि अमीषाने तारा सिंग आणि सकिनाची भूमिका साकारली होती. आता अभिनेता उत्कर्ष शर्मा हा तारा सिंगच्या मुलाची भूमिका साकारणार आहे.