मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला ‘गदर 2’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. २००१ मध्ये ‘गदर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यामुळे ‘गदर 2’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. ‘गदर 2’ सोबतच अभिनेता अक्षय कुमार याचा ‘OMG 2’ देखील प्रदर्शित झाला. पण ‘OMG 2’ सिनेमा ‘गदर 2’च्या लोकप्रियतेपुढे फेल ठरला. एवढंच नाही तर, ‘गदर 2’ नंतर अनेक सिनेमे देखील प्रदर्शित झाले. पण ‘गदर 2’ च्या पुढे कोणताही सिनेमा पोहचू शकला नाही. ‘गदर 2’ सिनेमा सलग 16 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. आता ‘गदर 2’ सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नुकताच ‘ड्रीम गर्ल 2’ प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर समाधान कारक कमाई करताना दिसत आहे. पण ‘गदर 2’ सिनेमा प्रदर्शनानंतर 16 व्या दिवशी इतिहास रचला आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार – रविवार असल्याचा फायदा सिनेमाला होताना दिसत आहे.
‘गदर 2’ सिनेमातील तारा सिंग याचा बोलबाला जगभर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त तारा सिंग आणि त्यांच्या डायलॉगची चर्चा रंगत आहे. 16 व्या दिवशी देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. 16 व्या दिवसाचे म्हणजे शनिवारचे सिनेमाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘गदर 2’ सिनेमाने तब्बल १३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आतापर्यंत सिनेमाने जवळपास 440 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात सिनेमाने तब्बल 575 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. अशात सिनेमा रविवारी किती कोटी रुपयांची कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘गदर 2’ बद्दल सांगायचं झालं त, 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाचा सिक्वेल आहे. गदरची फक्त स्टारकास्ट त्याच्या सिक्वेलमध्ये दिसली आहे. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा सिनेमात मुख्य भूमिकेत दिसले आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. ‘गदर 2’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सध्या सर्वत्र ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा…