मुंबई : सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. सनी देओल (Sunny Deol) याने बाॅलिवूडमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. मात्र, बरीच वर्षे झाली सनी देओल याच्या चित्रपटाला काही धमाका करण्यात यश मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वीच सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट (Movie) रिलीज झालाय. विशेष म्हणजे गदर 2 ने मोठा धमाका केलाय. गदर 2 चित्रपटाची एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. 22 वर्षांनंतरही तोच उत्साह चाहत्यांमध्ये बघायला मिळाला. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला.
गदर 2 चित्रपट नुकताच 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झालाय. पुढील काही दिवसांमध्ये गदर 2 च्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे सांगितले जातंय. मात्र, चित्रपटाने तूफान अशी कमाई केलीये. विशेष म्हणजे गदर 2 हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. अजूनही चाहते चित्रपटाला प्रेम देत आहेत.
मुंबईमध्ये सनी देओल याच्याकडून गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या सक्सेस पार्टीला अनेक बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. गदर 2 च्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरुख खान हा देखील पोहचला.
शाहरुख खान आणि सनी देओल याचा मुलगा करण यांचा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. शाहरुख खान याला पाहून लगेचच त्याच्या पाया पडताना सनी देओल याचा मुलगा करण दिसत आहे. यावेळी सनी देओल हा देखील तिथेच शेजारी दिसतोय. यावेळी करण याची पत्नी देखील आहे. यावेळी शाहरुख खान हा करणला प्रेमाने गळ्याला लावताना दिसला.
सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामध्ये तब्बल 16 वर्षांपासून मोठा वाद हा बघायला मिळत होता. मात्र, आता जुन्या गोष्टी विसरून शाहरुख खान आणि सनी देओल एकत्र आले आहेत. गदर 2 बघितल्यानंतर शाहरुख खान याने थेट सनी देओल याला फोन करत त्याचे काैतुक केले. इतकेच नाही तर सनी देओल याच्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठीही शाहरुख खान उपस्थित राहिला.
शाहरुख खान आणि सनी देओल यांचा एका चित्रपटादरम्यान वाद झाला. यानंतर हे दोघे एकमेकांना अजिबातच बोलत नव्हते. मात्र, आता यांच्यामध्ये मैत्री बघायला मिळत आहे. शाहरुख खान आणि सनी देओल यांना एकत्र पाहून चाहतेही आनंदी झाले. शाहरुख खान यांचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान दिसला.