मुंबई : सनी देओल याचा लेक राजवीर देओल (Rajveer Deol) याने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. राजवीर देओल दोनो चित्रपटात जबरदस्त भूमिका करताना दिसला. मात्र, राजवीर देओल याच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. राजवीर देओल याचा हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. दोनो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करण्यात आले. राजवीर देओल याला या चित्रपटाकडून प्रचंड अशा अपेक्षा नक्कीच होत्या.
राजवीर देओल याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना राजवीर देओल हा दिसलाय. राजवीर देओल थेट म्हणाला की, जेंव्हा तुम्ही लहान असतात, त्यावेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या गोष्टी आणि तुम्ही काय वाचता याचा प्रचंड असा प्रभाव तुमच्यावर होतो. माझ्यावरही तसाच व्हायचा.
कारण मी जे काही वाचत होतो आणि ऐकत होतो, त्याचा प्रभाव नक्कीच माझ्यावर होत होता. मी याचा खूप जास्त विचार करायचो. मात्र, हे नेहमीच तुम्ही जे वाचता आणि ऐकता ते सत्य असेल असे अजिबात नसते. सत्य काहीतरी वेगळेच असते. मी नेहमीच माझ्या आईला अनेक प्रश्न करायचो. विशेष म्हणजे तिने माझ्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिले.
माझे वडील (सनी देओल) यांच्याबद्दल अनेक अफवा सुरू असायच्या. मी त्यावर विचार करत कसायचो. मात्र, सत्य नेहमी वेगळे असायचे. माझ्या आईने मला एक खूप चांगले संस्कार दिले आहेत. वडील जास्त कडक असल्याने माझे आणि आईचे खूप जमते, असेही म्हणताना राजवीर देओल हा दिसला आहे.
राजवीर देओल याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनी देओल हा थेट जाहिरपणे नेपोटिझमवर बोलताना देखील दिसला. सनी देओल म्हणाला की, मला कित्येक दिवस नेपोटिझमचा अर्थच माहित नव्हता. पण मला एक सांगा प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करतो.
हे फक्त बाॅलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज बघायला मिळते. जर बापच आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल विचार करणार नाही तर मग कोण करणार ना? सनी देओल याच्या या विधानाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. अनेकांनी यावरून थेट सनी देओल याला खडेबोल सुनावण्यास देखील सुरूवात केली होती.