मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच सनी लियोनी ही मालदीवमध्ये धमाल करून परतली आहे. मालदीवमधील खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सनी लियोनी ही दिसली होती. सनी लियोनी हिने भारतामध्ये आपल्या करिअरची सुरूवात ही बिग बाॅसमधून (Bigg Boss) केलीये. विशेष म्हणजे बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला थेट बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळालीये. नुकताच सनी लियोनी ही कॅनेडी चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहचली होती. नुकताच सनी लियोनी हिने एक खास मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे सध्या सनी लियोनी ही प्रचंड चर्चेत आहे.
सनी लियोनी हिने या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे केले आहेत. सनी लियोनी म्हणाली की, अॅडल्ट स्टारपासून ते बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यापर्यंतचा माझा हा प्रवास म्हणावा तितका नक्कीच सोपा नव्हता. बस हे सर्व होत गेले. माझ्याबद्दल अत्यंत खराब ऑर्टिकल आले. लोक माझ्यावर नेहमीच चुकीच्या कमेंट करायचे.
मुळात म्हणजे आपण आपल्या आयुष्यात कशाप्रकारचे बदल घडवतो, हे सर्व आपल्यावर आधारित असते. सनी पुढे म्हणाली की, खरोखर हा रस्ता माझ्यासाठी अजिबातच सोपा नव्हता. एक अॅडल्ट स्टार असल्यामुळे मला कितीतरी चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पुढे सनी लियोनी म्हणाली की, काहीही झाले तरीही मी हार कधीच मानली नाही.
माझ्याबद्दल काय लिहिले जाते, याकडे मी दुर्लक्ष केले. सनी लियोनी पुढे इमोशनल होत म्हणाली की, कॅनेडी चित्रपटात डायरेक्टर अनुराग कश्यप यांनी मला एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिध्द करण्याची एक संधी दिली. यापूर्वी कोणत्याच डायरेक्टरने मला असे करण्याची संधी दिली नाही, हे सर्व बोलताना सनी लियोनी इमोशनल झाल्याचे देखील बघायला मिळाले.
जिस्म 2 या चित्रपटातून 2012 मध्ये सनी लियोनी हिने बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनी लियोनी हिने मोठा खुलासा केला होता. सनी लियोनी म्हणाली की, मला ज्यावेळी बिग बाॅसच्या निर्मात्यांचा फोन आला. त्यावेळी मी शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. मात्र, मला सतत निर्मात्यांचा फोन येत होता आणि मी शोसाठी अचानकपणे होकार दिला. परंतू मला भारतामध्ये यायचे नव्हते.