‘बिग बॉस ओटीटी 3’ शो संपल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी ‘सुपरस्टार सिंगर 3’ शोचा ग्रँड फिनाले देखील मोठ्या उत्साहात पार पडला. फिनालेच्या निमित्ताने स्पर्धकांनी गाणी गात परीक्षक आणि चाहत्यांचं मन जिंकलं. अखेर शोची ट्रॉफी केरळ येथील राहणारा अविर्भव एस आणि झारखंड येथे राहणाऱ्या अथर्व बख्शी यांनी जिंकली. ट्रॉफीसोबतच दोघांना लाखोंचे बक्षीस देखील मिळालं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अविर्भव आणि अथर्व यांची चर्चा रंगली आहे. चाहते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
जवळपास 5 महिन्यांनंतर ‘सुपरस्टार सिंगर 3’ शोला त्याला विजेता भेटला आहे. अथर्व आणि अविर्भव यांनी ट्रॉफी जिंकली आहे. शिवाय दोन्ही विजेत्यांना 10 – 10 लाख रुपये मिळाले आहेत. अविर्भव आणि अर्थ यांनी त्यांच्या गायनाने शोचे जज, सेलिब्रिटी आणि लोकांची मने जिंकली. अनेक महिन्यांच्या मेहनतीचं फळ दोघांना मिळालं आहे.
सांगायचं झालं तर, ‘सुपरस्टार सिंगर 3’ शोचा विजेता म्हणून अथर्व याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गायकाच्या वडिलांचं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. मुलाने संगीत क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं करावं अशी अथर्व याच्या वडिलांची इच्छा होती आणि अथर्व याने वयाच्या 12 व्या वर्षी वडिलांची इच्छा पूर्ण केली. हा क्षण ‘सुपरस्टार सिंगर 3’ शोमधील सर्वात भावूक करणारा क्षण होता.
‘सुपरस्टार सिंगर 3’ शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर अथर्व याने देखील आनंद व्यक्त केला. ‘एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. माझ्या कुटुंबाने माझ्यावर दाखवलेला विश्वास, समर्थन आणि प्रेमासाठी मी सर्वांचे आभार मानतो… मी माझे गुरु पवनदीप मिश्राचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. एक उत्तम कलाकार घडवण्यासाठी त्यांमी माझी मदत केली…’
पुढे विजेता अविर्भव याने देखील आनंद व्यक्त केला. ‘विश्वास बसत नाहीये… मी जिंकलो आहे. मी नेहा कक्कर, अरुणिता दीदी आणि माझं समर्थन करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. मी कठोर परिश्रम करत राहण्याचे वचन देतो आणि तुम्हा सर्वांचा अभिमान बाळगतो.’ असं अविर्भव म्हणाला…