यश याच्या वढदिवशी 3 चाहत्यांच्या मृत्यू, अभिनेता मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भेटला आणि…

| Updated on: Jan 09, 2024 | 12:03 PM

Yash : यश याच्या वढदिवशीच तीन चाहत्यांनी गमावले प्राण... तिघांच्या निधनाचं कारण जाणून व्हाल थक्क... चाहत्यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेत्याने घेतली मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट... अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

यश याच्या वढदिवशी 3 चाहत्यांच्या मृत्यू, अभिनेता मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भेटला आणि...
Follow us on

मुंबई | 9 जानेवारी 2024 : सुपरस्टार यश (Yash) याच्या वाढदिवशीच अभिनेत्याच्या तीन चाहत्यांचं निधन झालं. यश याच्या चाहत्यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधीत धक्कादायक घटना अभिनेत्या वाढदिवशीच घडल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन चाहत्यांच्या निधनाची माहिती कळताच यश याने मृत चाहत्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत दुःख व्यक्त करत आहे . सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश आणि अभिनेत्याच्या मृत पावलेल्या तीन चाहत्यांची चर्चा रंगली आहे.

सोमवारी संध्याकाळी वृत्त संस्था एएनआयने यश याचा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता मृत चाहत्यांच्या कुटुंबियाना भेटताना दिसत आहे. कर्नाटकातील हुबळी येथे पोहोचून तीन मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट यश याने घेतली. व्हिडिओमध्ये अभिनेता कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्याभोवती मीडिया आणि लोकांची गर्दी दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

यश याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस असल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सांगायचं झालं तर, दरवर्षी यश याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहते मोठे बॅनर लावतात. यंदाच्या वर्षी देखील चाहत्यांचा तोच प्रयत्न होता.

पण यश याच्या वाढदिवसाच्या दिवशी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. यश याचे बॅनर लावत असताना अभिनेत्याच्या तीन चाहत्यांचं निधन झालं आहे. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी बॅनर लावत असताना यश याच्या चाहत्यांना अचानक विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात दुर्दैवी अपघात झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत हरिजन (24), मुरली नाडू विनमणी (20), नवीन गाझी (20) अशी मृतांची नावे आहेत. आणखी तीन चाहते गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उरचार सुरु आहेत.