Suraj Chavan met Kedar Shinde:‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं नशीब पूर्णपणे बदलून गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सूरजचे घरातील वावारणे, सर्वांशी आदराने बोलणे, या आपल्या स्वभावाने त्याने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं त्याला भरभरून प्रेम मिळालं. त्याच्यातला साधेपणा प्रत्येकाला भावला. अशातच नुकताच त्याचा वाढदिवसही झाला आणि यानिमित्तानेही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाा. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर तो सर्वांच्या भेटीगाठी घेत आहे. त्याने नुकतीच केदार शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
सूरजची केदार शिंदेना आदराची अन् प्रेमाची मिठी
सूरज चव्हाण व केदार शिंदेंच्या या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वात जास्त भावणारा क्षण म्हणजे सूरजने केदार शिंदेंना मारलेली प्रेमाची आणि आदररुपी घट्ट मिठी. सूरजने त्यांचे मनापासून आशीर्वाद घेतले. केदार शिंदेंनी देखील त्याची खूप छान पाहुणचार केला. त्याला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तूही दिली.
या सगळ्या गिफ्ट्समध्ये एक खास गोष्ट होती ती म्हणजे देवाच्या पादुका… या पादुका पाहून सूरज भारावून गेला. त्याने केदार शिंदेंचे आभार मानले. हा सुंदर क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहेत, तसेच सूरजने व्हिडीओला ‘भेटला विठ्ठल माझा’ हे गाणही जोडलं आहे. त्यामुळे सूरज व केदार शिंदेंची ही भेट नेटकऱ्यांनाही भावली.
नेटकरीही झाले भावूक
केदार शिंदेंनी सूरजला खास गिफ्ट दिलं. या गिफ्टमध्ये एका बॉक्समध्ये मूर्ती दिसतेय. याशिवाय सोनेरी रंगाच्या पादुकाही पाहायला मिळाल्या. सूरज या भेटवस्तूचा प्रेमाने स्वीकार करतो. केदार व सूरज यांच्या या भेटीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “केदार शिंदे सर असंच लक्ष राहु द्या पोरावर”, “खुप छान आणि निस्वार्थ प्रेम”, “देवमाणूस, दगडाला देव बनवनारा , कारागीर”, “असे सुदंर भेट देणारा आणि घेणारा खरंच खूप नशीबवान असतात” अशा अनेक कमेंट करुन सर्वांनी सूरज व केदार शिंदेंचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सूरजला ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वाचा विजेता घोषित होताच केदार शिंदेंनी त्याच्यासाठी आणखी एक घोषणा केली होती. ती म्हणजे, लवकरच ते सूरज चव्हाणला घेऊन ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात सूरज मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.