सुशांत सिंह राजपूतबद्दल जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा, ‘ट्रिपमध्ये सारा – सुशांत एकाच हॉटेलमध्ये… ‘

| Updated on: Aug 06, 2024 | 7:54 AM

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूच्या 4 वर्षांनंतर जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा, सारा - सुशांत एकाच हॉटेलमध्ये... अभिनेत्याने ट्रिपसाठी खर्च केले लाखो रुपये..., आजही अभिनेत्याच्या निधनाचं कारण गुलदस्त्यात...

सुशांत सिंह राजपूतबद्दल जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा, ट्रिपमध्ये सारा - सुशांत एकाच हॉटेलमध्ये...
Follow us on

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं होतं. कुटुंब बॉलिवूडमधील नसताना देखील सुशांत याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं. पण अभिनेत्याच्या धक्कादायक एक्झीटमुळे चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. सुशांतच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. पण अभिनेत्याने स्वतःला का संपवलं? हे रहस्य अद्यापही रहस्याचं आहे. आता अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठी माहिती समोर येत आहे. सुशांत, सारा आणि ट्रिपबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

सुशांत सिंह राजपूत याचा एक्स-असिस्टेंट साबिर अहमद याने नुकताच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बँकॉक ट्रिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. साबिर अहमदने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सारा अली खान देखील ट्रिपमध्ये सुशांत सोबत होती. शिवाय सुशांतने ट्रिपसाठी केलेला खर्च देखील लाखो रुपयांमध्ये होता.

साबिर अहमद याने दिलेल्या माहितीनुसार, ‘बँकॉक ट्रिपसाठी आम्ही सात जण गेलो होतो. सुशांत, सारा, सिद्धार्थ गुप्ता, कुशाल जावेरी, अब्बास, सुशांतचा बॉडीगार्ड मुश्ताक आणि मी… डिसेंबर 2018 मध्ये आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि प्रायव्हेट जेटने गेलो होतो… फक्त पहिल्या दिवशी आम्ही सर्व एकत्र बिचवर गेलो… त्यानंतर संपूर्ण ट्रिप सुशांत आणि सारा हॉटेलमध्ये थांबले होते…

साबिर पुढे म्हणाला, ‘सारा आणि सुशांत बँकॉकमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते.’, एवढंच नाही तर, सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने देखील अभिनेत्याच्या बँकॉक ट्रिपबद्दल सांगितलं होतं. ‘सुशांतने ट्रिपसाठी 70 लाख रुपये खर्च केले होते…’ असं रिया म्हणाली होती.

सुशांत – सारा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी ‘केदारनाथ’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. ‘केदारनाथ’ सिनेमातूनच साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या.  सुशांतच्या निधनानंतर साराची देखील चौकशी करण्यात आली होती.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

सुशांत सिंह राजपूत याने 20 जून 2020 मध्ये त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. सुशांत सिंह हत्या प्रकरणी अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील करण्यात आली. पण सुशांतने इतकं मोठं पाऊल का उचललं अद्याप समोर आलेलं नाही.