मुंबई | 9 जानेवारी 2024 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. तरी देखील अभिनेत्याला चाहते विसरु शकलेले नाहीत. आजही सुशांत याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील सुशांत याच्याबद्दल मोठी गोष्ट समोर आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने अभिनेता क्लॉस्ट्रोफोबिया नावाच्या आजाराचा सामना करत असल्याचं सांगितलं होतं. पण तेव्हा सुशांत याला कोणताही आजार नव्हता असं अंकिका लोखंडे हिने सांगितलं होतं. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने ‘बिग बॉस 17’ मध्ये सुशांत याला क्लॉस्ट्रोफोबिया हा आजार होता… ही गोष्ट मान्य केली आहे.
दरम्यान, सुशांत यांच्या निधनानंतर जेव्हा रिया हिने अभिनेत्याच्या आजाराबद्दल सांगितलं होतं, तेव्हा अंकिता हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सुशांत विमान चालवताना दिसत आहे. सुशांत याच्या निधनानंतर अंकिता हिने व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हा रिया हिच्या वक्तव्यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते.
In tonight’s episode, Ankita Lokhande mentions Sushant Singh Rajput was claustrophobic.
However, in 2020 when Rhea Chakraborty had said the same thing that Sushant was claustrophobic, Ankita denied it and she evn shared a video of the SSR flying an airplane, questioning Rhea’s… pic.twitter.com/XcI65PXh9W
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 2, 2024
दरम्यान, सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहेत. ‘बिग बॉस 17’ मध्ये सुशांत क्लॉस्ट्रोफोबिया या आजाराचा सामना करत होता… असं वक्तव्य अंकिता हिने केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर देखील नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये अंकिता कायम सुशांत याच्याबद्दल सांगत असते. सुशांत याच्यासोबत असलेल्या अनेक आठवणी अंकिता बिग बॉसमध्ये सांगताना दिसते. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात येतं. फक्त प्रसिद्ध आणि लोकप्रियतेसाठी सुशांत याच्यानावाचा वापर करते… असं अनेक जण म्हणतात. अंकिता आणि सुशांत यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही…
क्लॉस्ट्रोफोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बंद किंवा लहान ठिकाणी गेल्यावर गुदमरल्यासारखं आणि चिंताग्रस्त वाटू लागतं. फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापासून लिफ्ट वापरण्यापर्यंत त्यांच्यामध्ये अस्वस्थता असते. यामुळे आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना थरकाप, अस्वस्थता, मळमळ आणि चक्कर येणं जाणवू लागतं.
सुशांत सिंह राजपूत याने 2020 मध्ये मुंबईतील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र मोठी खळबळ माजली होती. सुशांत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. सुशांत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत, पण सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक चर्चा सुरु असतात.