मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या सेलिब्रिटीचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत आहे. बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे कमी तर, रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे ती, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आहे. रिया हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री प्रकाश झोतात आली…
पण सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात रिया हिच्यावर अनेक आरोप करण्यात आले. एवढंच नाही तर, रिया हिला तुरुंगात देखील जावं लागलं. सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला.. पण आता भूतकाळ विसरुन रिया आता आयुष्याचा आनंद घेत आहे.
सध्या सर्वत्र रिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. रिया एका श्रीमंत उद्योजकाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्टनुसार, रिया उद्योजन निखील कामत याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहेत. निखिल जोरोधी कंपनीची मालक आहे. सध्या सर्वत्र निखिल आणि रिया यांच्या रिलेशिनशिपच्या चर्चा रंगत आहेत.
रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्ती हिने क्रिकेटर विराट कोहली याचा मॅनेजर बंटी सजदेह याला देखील डेट केलं आहे. बंटी सजदेह हा अभिनेता सोहेल खान याची पहिली पत्नी सीमा सजदेह हिचा भाऊ आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण रिया हिने कधीही नात्याबद्दल सत्य सांगितलं नाही..
रिया चक्रिवर्ती हिला डेट करण्यापूर्वी निखिल कामत याने मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिला देखील डेट केलं आहे. दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय त्यांच्या ट्रिपचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मानुषी आणि निखिल यांनी एकमेकांना जवळपास एक वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
रिया हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगयचं झालं तर, अभिनेत्री सध्या एमटीव्हीवरील ‘रोडीज’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.