दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यावर बरीच टीका झाली होती. ड्रग्ज केसमध्ये तिचं नाव आलं होतं. त्यानंतर रिया लाइमलाइट पासून दूर गेली होती.
आता दोन वर्षानंतर रिया परत आली आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय आहे. होळीच्या निमित्ताने रियाने काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती खूप आनंदी दिसतेय.
रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. होळीच्या निमित्ताने तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. रियाने सफेद रंगाचा ड्रेस घातला होता. तिच्या हातात पिचकारी आहे. दुसऱ्या फोटोत ती कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.
रिया चक्रवर्तीचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. तुझी पोस्ट पाहून मला आनंद झाला आहे. हॅप्पी होली म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या एका चाहत्याने अशीच आनंदात रहा, I Love You असा मेसेज लिहिला आहे.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या मेहंदी सेरेमनीमध्ये सुद्धा मध्यंतरी रिया दिसली होती. मेहंदीमध्ये रियाने जोरदार नृत्य केलं होतं.