बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांच्या अनेक प्रयत्नांनंतरही अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआय टीमदेखील सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्यासाठी कसून तपास करत आहे. अशात एम्सच्या अहवालानंतर तपासाला वेगळं वळण लागलं आहे.
सगळ्यात आधी सीबीआय टीमने मुंबई पोलिसांकडे घटनेचे अपडेट्स मागितले आणि त्यानंतर त्यांच्या पद्धतीने पुढली तपास सुरू केला. या तपासाअंतर्गत आता महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टर्स टीमला सुशांतच्या आत्महत्येच्या टायमिंगवरून शंका विचारली होती. ज्यांनी सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली होती त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली होती. यात 5 ऑगस्टला मुंबई पोलिसांना डॉक्टरांचा रिपोर्ट मिळाला होता.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही घोळ झाला का? असा आरोप होत होता. पण यानंतर शवविच्छेदन आणि फॉरेंसिक रिपोर्ट हा सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्यात आला. आता हा सीबीआयकडे पाठवण्यात आला आहे.
अहवालानुसार, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, सुशांतचा मृत्यू शवविच्छेदनाच्या 10 ते 12 तास आधी झाला होता. रात्री 11:30 वाजता सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले.
ज्या कपड्याने गळफास घेत सुशांतने आत्महत्या केली होती, त्याचा फॉरेंसिक रिपोर्ट मुंबई पोलिसांना 27 जुलै रोजी मिळाला होता. अहवालानुसार, आत्महत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला कपडा 200 किलो वजन उचलण्यासाठी सक्षम होता. कपड्याचं फायबर आणि सुशांतच्या गळ्याभोवती मिळालेल फायबर हे एकच होतं. सीबीआयकडे सध्या या सगळ्याचे रिपोर्ट्स आहेत आणि ते त्यांच्या पातळीवर याची चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली यावर मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
या दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. सध्या सीबीआय संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचं बोललं जातं आहे.