सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आता या अब्जाधिशासोबत रिलेशनशिपमध्ये, इतक्या कोटींची संपत्ती

| Updated on: Aug 17, 2024 | 8:21 PM

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिला अटक ही झाली आणि नंतर जामिन मिळाला. पण आता ती पुन्हा एकदा रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोलतं आहे. ती एका मोठ्या उद्योजकाला डेट करत असल्याची चर्चा आहे. ज्याची संपत्ती कोटींमध्ये आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आता या अब्जाधिशासोबत रिलेशनशिपमध्ये, इतक्या कोटींची संपत्ती
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चांगलीच चर्चेत आली होती. तिने ‘MTV India’ वर VJ म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मग तिने ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटात पहिल्यांदा काम केले. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’, ‘चेहरे’, ‘जलेबी’ आणि ‘सोनाली केबल’ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले. पण अभिनेत्री सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आत्महत्येनंतर प्रचंड ट्रोल झाली. कारण ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतच्या आत्महत्येसाठी लोकं तिला जबाबदार धरत होते.

आता रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ती नुकताच ‘झिरोधा’चे संस्थापक निखिल कामथसोबत दिसली. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. 17 ऑगस्ट 2024 रोजी ती निखिलच्या बाईकवरून फिरताना दिसली होती.

निखिल कामतची संपत्ती किती?

निखिल कामथ याची एकूण संपत्ती $3.1 अब्ज आहे, जी भारतीय चलनानुसार 26024 कोटी रुपये आहे. आता तो रियासोबत दिसत असल्याने नेटिझन्सनी त्याच्यावर देखील टीका करत आहे. अभिनेत्रीला पुन्हा एकदा ‘गोल्ड डिगर’ म्हणून टॅग केले जात आहे. अलीकडेच ‘Reddit’ वर एका युजरने म्हटले की, “बंधू किंवा चाहते रडत राहिले आणि आता ती अब्जाधीशसोबत हँग आउट करत आहे. निखिल ब्लॅक जॅकेट आणि शॉर्ट्समध्ये दिसत होता. त्याने फेस मास्क आणि हेल्मेट घातले होते.

सुशांतच्या मृत्यूनंतर मीडिया ट्रायल

2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागले होते. सप्टेंबर 2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात तिला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये तिला जामीन मंजूर झाला. या वर्षाच्या सुरुवातीला, मार्चमध्ये, एनडीपीएस कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने रियाला तिच्या कुटुंबासह थायलंडला लहान सुट्टीसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली होती.

कोण आहे निखिल कामथ?

निखिल कामथ हा व्यावसायिक आहे. 9000 कोटींहून अधिक संपत्तीसह, निखिल कामथ हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहे. त्याने 2019 मध्ये अमांडा पूर्वंकरासोबत लग्न केले होते, परंतु ते जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर 2021 मध्ये, त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.