मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेन हिने अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुष्मिता हिने बॉलिवूडला दिलेल्या योगदानामुळे देखील अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं होतं. पण आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी अभिनेत्रीची प्रकृती खालावल्यामुळे सुष्मिता हिच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला. नुकताच टेक्नो इंडिया यूनिवर्सिटी तर्फे (Techno Indian University) अभिनेत्रीला डॉक्टरेट पदवी देत सन्मानित केलं. पण प्रकृती खालावल्यामुळे सुष्मिता कार्यक्रमासाठी पोहोचू शकली नाही. तेव्हा सुष्मिताच्या वतीना सन्मान ग्रहण केला.
सुष्मिता सेन हिला पश्चिम बंगालमधून डी.लीट (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही पदवी प्रदान करण्यात आली. आनंद व्यक्त करत अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. खास फोटो शेअर करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘किती मोठा सन्मान! मला डी.लिटचा सन्मान दिल्याबद्दल टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटी आणि नारायणमूर्ती यांचे खूप आभार.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझे शुभीर सेन, ज्यांना माझ्या वतीने कलकत्ता याठिकाणी डॉक्टरेट मिळाली. त्यांनी विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचं कौतुक देखील केले. कॉन्वोकेशन कार्यक्रम किती छान होता.. हे देखील वडिलांनी मला सांगितलं. मला हा सन्मान दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एवढंच नाही तर, कॉन्वोकेशनमध्ये का उपस्थित राहू शकली नाही, याबद्दल देखील अभिनेत्री स्पष्टीकरण दिलं आहे. ‘नमस्कार… मी तुम्हा सर्वांची माफी मागते… कारण या कॉन्वोकेशनमध्ये मी येवू शकली नाही. मला तुम्हाला सर्वांना भेटायचं होतं. पण व्हायरल असल्यामुळे मला डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलं आहे… ज्यामुळे मी कॉन्वोकेशनमध्ये उपस्थित राहू शकली नाही…’
सुष्मिता हिने वडिलांबद्दल देखील भावना व्यक्त केल्या आहेत. ‘एके दिवशी विद्यापीठाकडून आपली मुलगी डॉक्टरेट पदवी मिळवेल अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. वयाच्या १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स होण्याचे स्वप्न घेऊन मी भारत सोडला. मी बाबांना वचन दिले होते की त्यांचे हे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करीन.’ डॉक्टरेट पदवी मिळवल्यामुळे चाहते देखील अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.