Farah Khan Ali Divorce : लग्न एक असं नातं असतं ज्यामध्ये विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टींची सर्वात जास्त गरज असते. पण अनेकदा नाती फार काळ टिकत नाहीत. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता देखील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने घटस्फोट घेतला आहे. अभिनेता हृतिक रोशन याची पहिली पत्नी सुझान खान हिची बहीण फराह खान (Farah Khan Ali) हिचा घटस्फोट झाला आहे. नुकताच फराह हिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पहिला पती डीजे अकील (dj aqeel) याच्यासोबत घटस्फोट घेतल्याची महिती दिली आहे. सध्या फराहची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Farah Khan Ali Divorce)
डीजे अकील याच्यासोबत सेल्फी फोटो शेअर करत फराह म्हणाली, ‘आता आम्ही अधिकृतरित्या विभक्त झालो आहेत आणि आम्ही आनंदी आहोत. पुढच्या आयुष्यासाठी आणि प्रेमपूर्ण जीवनासाठी प्रार्थना करतो. विभक्त झालो असलो तरी मुलं अझान आणि फिझा यांच्यासाठी कायम आई-बाबा राहू… आतापर्यंतच्या प्रवासासाठी धन्यवाद….’
फराहच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिला आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटींनी देखील फराह हिला दिलासा दिला आहे. फराहच्या पोस्टवर बहीण सुझान कमेंट करत म्हणाली, ‘दोघांना प्रचंड प्रेम… एक चांगली सुरुवात… तुम्ही दोघे जबरदस्त आहात…’, सुझान शिवाय फराहच्या पोस्टवर कुब्रा सैत, दिया मिर्जा, भावना पांडे आणि ट्विंकल खन्ना यांनी देखील फराहला पाठिंबा दिला आहे.
फराह आणि डी जे अकील दोघे २०२१ मध्ये विभक्त झाले होते. पण आता फराहने घटस्फोट घेत विभक्त झाल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. फराह आणि डीजे अकील यांचं लग्न 1999 मध्ये झालं होतं. आता तब्बल २४ वर्षांनंतर फराह आणि डीजे अकील विभक्त झाले आहेत.
फराह हिची बहीण सुझान खान हिचं देखील घटस्फोट झालं आहे. हृतिक आणि सुझानचा 2014 मध्ये घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुलं आहेत. हृतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसवला. घटस्फोटानंतर दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.
घटस्फोटानंतर सुझान आणि हृतिक यांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. घटस्फोटानंतर हृतिक, सबा आझाद हिला डेट करत आहे, तर दुसरीकडे सुझान, अर्सलान गोणी याला डेट करत आहे. हृतिक – सबा आझाद आणि सुझान – अर्सलान कायम अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.