मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री स्वरा भास्कर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता देखील स्वरा एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. स्वरा भास्कर आई झाली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरा भस्कर आणि पती फहाद अहमद यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीने लेकीची पहिली झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे. सध्या स्वरा तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर चिमुकलीचे फोटो पोस्ट करत नावाची घोषणा देखील केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्वरा भास्कर आणि तिच्या लेकीची चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने पतीसोबत देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.
स्वराने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये दोघे चिमुकलीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत स्वराने कॅप्शनमध्ये, ‘एक प्रार्थना ऐकली… आशीर्वाद दिला… एक गीत ऐकवलं गेलं… एक रहस्यमय सत्य…. आमची मुलगी राबिया हिचा २३ सप्टेंबर २०२३ मध्ये जन्म झाला… ही एक वेगळी दुनिया आहे…’ असं लिहिलं आहे.
स्वरा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला डोक्यावर घेतलं. पण गेल्या काही दिवसांपासून स्वरा बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर स्वरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात…
फहाद अहमद समाजवादी पार्टीचे नेते आहेतट. स्वरा आणि फहाद अहमद यांनी रजिस्टर्ड मॅरिज केलं आहे. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रजिस्टर्ड मॅरिजनंतर स्वरा आणि फहाद अहमद यांनी दिल्ली याठिकाणी मोठ्या थाटात लग्न केलं…
स्वरा आणि फहाद अहमद यांची पहिली भेट २०२० मध्ये झाली होती. एका रॅलीच्या माध्यमातून दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाल्याची माहिती खुद्द स्वरा भास्कर हिने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली.. सध्या अभिनेत्री मातृत्वाचा अनुभव घेत आहे.