Swara Bhasker | ‘लग्नानंतर हिंदू-मुस्लीम यांच्या संस्कृतीत..’; स्वरा भास्करची पोस्ट व्हायरल

| Updated on: Oct 02, 2023 | 3:45 PM

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या घरी 23 सप्टेंबर रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. बाळाच्या जन्मानंतर सहा दिवसांनी छठी पूजा करण्यात आली. या छठी पूजेचा एक व्हिडीओ स्वराने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी तिने हिंदू-मुस्लीम यांच्या संस्कृतीतील साम्यतेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

Swara Bhasker | लग्नानंतर हिंदू-मुस्लीम यांच्या संस्कृतीत..; स्वरा भास्करची पोस्ट व्हायरल
Swara Bhasker
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्या घरात काही दिवसांपूर्वीच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. स्वरा आणि फहादने त्यांच्या मुलीचं नाव ‘राबिया’ असं ठेवलं. मुलीच्या जन्मानंतर सहा दिवसांनी त्यांनी ‘छठी पूजा’ केली. या पूजेचे काही फोटो स्वराने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. स्वराने फहादशी लग्नाची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र आता लग्नानंतर हिंदू आणि मुस्लीम यांच्यात बरीच सांस्कृतिक समानता असल्याचं जाणवतं असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

स्वराने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये छठी पूजा करताना तिचे कुटुंबीय चिमुकलीला, स्वराला आणि फहादला काजळ लावताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ शेअर करत स्वराने लिहिलं, ‘आमचं बाळ आमच्यासारखंच मिश-मॅश आहे. म्हणजेच ती 62.5 टक्के उत्तरप्रदेशची, 12.5 टक्के बिहारची आणि 25 टक्के आंध्रची आहे. मी इथे त्या सर्वांचंच प्रतिनिधित्व करतेय आणि विविधतेतील ही समानता साजरी करण्यासाठीच मी इथे आहे. लग्न झाल्यापासून आम्हाला उत्तर भारतातील हिंदू आणि मुस्लीम यांच्या संस्कृतीत बरीच समानता आढळतेय. माणूस सर्व प्रकारच्या विविधतेतून पुढे आला तरी प्रेम आणि आनंद यांची भाषा समानच असते यावरील माझा विश्वास आणखी दृढ झाल आहे.’

हे सुद्धा वाचा

या पोस्टमध्ये स्वराने छठी पूजेचंही महत्त्व सांगितलंय. “उत्तरप्रदेश-बिहारमध्ये बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी छठी पूजा केली जाते. यावेळी आई आणि बाळाला हळदीच्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. त्यानंतर आत्या बाळाला आणि बाळाच्या आईवडिलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काजळ लावते.”

स्वराने 23 सप्टेंबर रोजी राबियाला जन्म दिला. मुलीच्या जन्माच्या दोन दिवसांनंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बाळाच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्याचवेळी त्यांनी बाळाचं नाव राबिया ठेवल्याचं जाहीर केलं होतं. राबिया या नावाचा अर्थ वसंत ऋतू किंवा राणी असा होतो. स्वरा आणि फहादने या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानले. त्याचसोबत पालक म्हणून आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी फार उत्सुक असल्याचं दोघांनी म्हटलं आहे.