मुंबई | 29 जुलै 2023 : ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. १५ वर्षांच्या प्रवासात मालिकेने अनेक चढ – उतार पाहिले. पण मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांना पोट धरुन हसवणं थांबवलं नाही. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील अनेक भूमिकांचे चेहरे बदलले पण ‘दयाबेन’ हिची जागा मात्र कोणी भरुन काढू शकलं नाही. आजही चाहते दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) हिची एक झकल पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण गेल्या पाच वर्षांपासून दयाबेन झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर दयाबेनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दिशा वकानी हिला पाहिल्यानंतर चाहते आनंदी झाले आहेत.
दरम्यान, नुकताच एका कपलने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर दिशा वकानी हिच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ मालिकेतील दिशाला म्हणजे दयाबेन हिला तुम्ही पाहू शकता. सध्या सर्वत्र दिशा वकानी हिची चर्चा सुरु आहे.
दिशाचे चाहत्यांसोबत फोटो देखील व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, चाहत्यांनी दिशा हिला भेटल्यानंतर आलेला अनुभव देखील शेअर केला आहे. मोबाईलमध्ये माझा चेहरा एडिट कर असं देखील अभिनेत्री चाहत्यांनी म्हणाली. ‘दया फार चांगली आहे. तिचा स्वभाव देखील फार चांगला आहे. तिला भेटण्यासाठी फार कमी वेळ मिळाला..’ असं देखील दिशाचे चाहते म्हणाले.
दिशाने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता. मोठ्या ब्रेकनंतर देखील दिशा मालिकेत परतली नाही. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. एवढंच नाही दिशा सोशल मीडियावर देखील सक्रिय नसते. गेल्या पाच वर्षांपासून अभिनेत्रीला कोणी पाहू शकलेलं नाही. पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे चाहत्यांना दिशा वकानी हिची एक झलक पाहता आली.
दिशा मालिकेत पुन्हा कधी येणार… असा प्रश्न चाहते अनेकदा विचारतात. पण आता दिवाळीत अभिनेत्री मालिकेत पुन्हा दमदार पदार्पण करेल असं सांगण्यात येत आहे. मालिकेच्या एका एपिसोडमध्ये सुंदरलाल याने दयाबेन दिवाळीत गोकुळधाम सोसायटीत येणार अशी घोषणा केली. ज्यामुळे चाहते दयाबेन आणि दिवाळीच्या प्रतीक्षेत आहेत.