‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्रीने 6 महिन्यांत कमी केलं 17 किलो वजन; शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क!

| Updated on: Dec 09, 2024 | 10:05 AM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री दिप्ती सिधवानीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. दिप्तीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की गेल्या 6 महिन्यात तिने 17 किलो वजन कमी केलंय.

तारक मेहता.. फेम अभिनेत्रीने 6 महिन्यांत कमी केलं 17 किलो वजन; शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क!
Deepti Sadhwani
Image Credit source: Instagram
Follow us on

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर दिप्ती सिधवानी सध्या तिच्या आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. दिप्तीने तिचं वजन कमी केलं असून फिटनेसवरही अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. दिप्तीने सहा महिन्यांत 17 किलो वजन कमी केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिप्तीने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी सांगितलं. “हे सोपं नव्हतं. असे बरेच दिवस होते जेव्हा मला वाटलं की सर्वकाही सोडून द्यावं. पण त्यावेळी मी स्वत:ला आठवण करून देत होती की एक छोटं पाऊलसुद्धा महत्त्वाचं असतं. प्रगती हळूहळू होत होती पण त्यात सातत्य टिकवून ठेवलं. यातच सगळी जादू आहे”, असं ती म्हणाली.

दिप्ती तिच्या रुटीनविषयी म्हणाली, “मी साखर, प्रोसेस्ड फूड खाणं पूर्णपणे बंद केलं होतं. त्याचसोबत ग्लूटन फ्री डाएट सुरू केला होता. मी 16 तास स्ट्रिक्ट इंटरमिडीएड फास्टिंग केली होती. त्याचसोबत माझ्या पोटात किती कॅलरीज जात आहेत, यावरही बारकाईने लक्ष दिलं. मी संतुलित आहारासोबतच कधी कधी ‘चीट डे’सुद्धा ठेवले होते. त्यादिवशी मी माझ्या आवडीचे किंवा काही गोडधोड खायचे. त्याचसोबत मी व्यायामावरही खूप भर दिला. योगसाधना, बॉक्सिंग आणि स्विमिंग करून मी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. फक्त वजन कमी करणं हा माझा उद्देश नव्हता. त्याचसोबत मानसिक स्वास्थ्य राखणं आणि शरीरात ऊर्जा टिकवणं हेसुद्धा महत्त्वाचं होतं.”

हे सुद्धा वाचा

दिप्ती ही सोशल मीडिया इन्फ्सुएन्सरसुद्धा आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. दिप्तीने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्येही हजेरी लावली होती. कान्स 2024 मधील तिचा लूक खास चर्चेत होता. दिप्तीला ‘तारक मेहता..’ या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने ‘हास्यसम्राट’मध्येही काम केलंय. इतकंच नव्हे तर तिने दोन चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.