मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज देखील मालिका तितक्याच जोमाने चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक कलाकार सोडून गेले. पण जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आजही चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. दिलीप जोशी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे दिलीप जोशी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. आता देखील दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुणे येथे भोसरी याठिकाणी एका कार्यक्रमात दिलीप जोशी उपस्थित होते. तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि चाहते बबिता बबिता मोठ्याने ओरडू लागले. तेव्हा दिलीप जोशी विनोदी अंदाजात चाहत्यांना म्हणाले, ‘अरे लहान लहान मुलांनो बबिता बबिता करताय, कुठेयत तुमचे वडील कुठे आहेत, की वडील पण बबिता बबिता करत आहेत…’ सध्या सर्वत्र दिलीप जोशी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या दिलीप जोशी यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्ल आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, मालिकेत जेठालाल आणि बबिता यांच्यामध्ये असणारी केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. बबिता हिच्यावर जेठालाल याचं असलेलं प्रेम मालिकेतील महत्त्वाचा घटत आहे. मालिकेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका एपिसोडसाठी दिलीप जोशी तब्बल १.५ कोटी मानधन घेतात. म्हणजे महिन्याला जेठालाल मालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात. मालिकेत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये दिलीप जोशी अव्वल स्थानी आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेशिवाय दिलीप जोशी यांनी ‘कभी ये कभी वो’, ‘हम सब एक है’, ‘FIR’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. अनेक सिनेमांमध्ये देखील दिलीप जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे दिलीप जोशी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.