‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिकेतील रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग तब्बल 25 दिवस बेपत्ता होता. अभिनेता बेपत्ता झाल्याची तक्रार खुद्द वडिलांनी दाखल केली होती. पण जेव्हा अभिनेता 25 दिवसांनंतर स्वतः घरी परतला तेव्हा गुरुचरण याच्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला. आता 25 दिवसांनंतर घरी परतलेल्या गुरुचरण याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेता मुंबई कामयची सोडून दिल्लीत आई – वडिलांकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा रंगली आहे.
गुरुचरण सिंग याचा मित्र सोनी याने अभिनेत्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. एका मुलाखतीत सोनी म्हणाला, ‘गुरुचरण सिंग आता कायमचा दिल्लीत जाणार आहे. गुरुचरणसोबत त्याचे आई – वडील मुंबईत येणार होते. पण त्याचं वय जास्त असल्या कारणामुळे ते मुंबईत येऊ शतक नाही. त्यामुळे गुरुचरण दिल्लीत जाणार आहे.’
सोनी याने गुरुचरण याच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती दिली आहे. ‘आता गुरुचरण सिंगची प्रकृती स्थिर आहे. तो लवकरच दिल्लीसाठी रवाना होईल. कारण त्याचे आई – वडील मुंबईत येऊ शकत नाहीत…’ सांगायचं झालं तर, गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी घर सोडून गेला होता. त्यानंतर 25 दिवसांनी म्हणजे 18 मे रोजी अभिनेता घरी परतला.
घरी परतल्यानंतर गुरुचरण सिंग याची पोलिसांनी चौकशी केली होती. तेव्हा आध्यात्मिक प्रवासासाठी गेल्याची कबुली अभिनेत्याने दिली होती पण याबद्दल अभिनेत्याच्या वडिलांना कोणत्याच प्रकारची माहिती नव्हती. शिवाय घरी परतल्यानंतर अभिनेत्याचा एक फोटो देखील तुफान व्हायरल झाला होता. अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.
गुरुचरण सिंग सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्याने रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत चाहत्यांना पोट धरुन हसायला लावलं होतं. 2020 पर्यंत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण नंतर मालिकेला निरोप दिला. आजही त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.