मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मालिकेतील अनेक कलाकांनी असित मोदी याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. जेनिफर मिस्त्री हिच्या एका विधानामुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जेनिफर मिस्त्री हिने निर्माता असित कुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याची तक्रार दाखल केली. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
आता पुन्हा जेनिफर हिने खळबळजनक आरोप केले आहेत. २०२२ मध्ये जेव्हा अभिनेत्रीच्या भावाचं निधन झालं, तेव्हा सोहेल याने केलेल्या वागणुकीबद्दल जेनिफर हिने मौन सोडलं आहे. भावाचा प्रकृती खालावल्यानंतर जेनिफर हिने रडत – रडत सुट्टीसाठी विनंती केली. पण जेव्हा आभिनेत्री सोहेल रमाणीकडे सुट्टी मागण्यासाठी गेली तेव्हा तो तिच्यावर ओरडला.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या भाऊ जेव्हा व्हेंटिलेटर होता. तेव्हा मी सोहेल रोमाणी याला मला नागपूरमध्ये जायचं आहे असं सांगितलं.’ यावर सोहेल अभिनेत्रीला म्हणाला, ‘शुटिंग पूर्ण कर त्यानंतर जा..शूट सोडून गेलीस तर लक्षात ठेवच.. शूट संपल्यानंतर तू जावू शकतेस…’ अभिनेत्रीने सोहेलकडे विनंती केली, ‘माझा भाऊ शेवटच्या घटीका मोजत आहे. तो व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे, त्याचं निधन होवू शकतं…’
भावाच्या निधनानंतर असीत मोदी याने लगेच कामावर परतण्यास सांगितले नाही. शिवाय सोहेलला मानधन कमी करु नको असं देखील मोदीने सांगितलं.. असं स्पष्टीकरण जेनिफर हिने केलं. पण जेव्हा जेनिफर भावाच्या निधनानंतर पुन्हा सेटवर परतली तेव्हा, सोहेल कायम ‘हिच्या भावाचं निधन झालं, आता आपले पैसे कोण देणार…’ असं म्हणत असल्याचं वक्तव्य अभिनेत्रीने केलं..
भावाच्या निधनानंतर असीत मोदी माझ्यासोबत चांगले बोलले असल्याचा खुलासा देखील अभिनेत्रीने केला आहे. सध्या सर्वत्र जेनिफर मिस्त्री हिने केलेल्या आरोपांची चर्चा रंगत आहे. आता याप्रकरणी पुढे कायम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका आणि मालिकेतील कलाकार करत असलेल्या आरोपांची चर्चा रंगत आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. पण आता मालिका वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आहे.