तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका जवळपास 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. सिनेमात अनेक चढ-उतार आले, अनेकांनी मालिकेचा निरोप देखील घेतला. पण मालिकेचा प्रवास थांबला नाही. मालिकेत सोनू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता हिने देखील मालिकेचा निरोप घेतला. आता झिल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
झिल मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट केले होते. आता झिलच्या लग्नाच्या तयारी सुरु झाली आहे. नुकताच, झिल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
झिल हिने बॅचलर पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने ‘Bride-to-be’ असं शोल्डर स्ट्रॅप लावला आहे. सध्या सोशल मीडियावर झिलचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. कमेंटच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
सांगायचं झालं तर, झिल हिने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदित्य दुबे याच्यासोबत साखरपुडा केल. आदित्य याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो व्हिडीओ गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि थ्रीडी आर्टिस्ट आहे. झिलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, शिक्षण पूर्ण करण्यासाठी झिल हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा निरोप घेतला. आता अभिनेत्री स्वतःचा व्यवसाय करत आहे.
मालिकेचा निरोप घेतल्यानंतर झील तिच्या आईसोबत ब्यूटी बिझनेसमध्ये काम करत आहे. झील मेहता मेकअप आर्टिस्ट आहे, तर झीलची आई हेअर स्टायलिस्ट आहे. आई आणि मुलगी मिळून व्यवसाय करतात. सोशल मीडियावर झील आणि तिच्या आईचा मेकअप पेज देखील आहे. झील कायम सोशल मीडियावर मेकअप संबंधीत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.