तारक मेहता… फेम शैलेश लोढा यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; म्हणाले, ‘आयुष्यात पूर्णपणे काळोख…’

| Updated on: Aug 30, 2024 | 8:37 AM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम शैलेश लोढा यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, निधनाचं कारण समोर, अभिनेते दुःख व्यक्त करत म्हणाले, 'आयुष्यात पूर्णपणे काळोख...', कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

तारक मेहता... फेम शैलेश लोढा यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; म्हणाले, आयुष्यात पूर्णपणे काळोख...
Follow us on

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेते शैलेश लोढा आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शैलेश लोढा यांचे वडील श्यान सिंह लोढा यांचं निधन झालं आहे. शैलेश यांच्या वडिलांच्या निधनाचं कारण देखील समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शैलेश यांच्या वडिलांची प्रकृती स्थिर नव्हती. वडिलांच्या निधनामुळे शैलेश लोढा यांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय सिनेविश्वातील अनेकांनी दुःख देखील व्यक्त केलं आहे.

वडिलांच्या निधनानंतर शैलेश लोढा यांनी भावूक पोस्ट लिहित दुःख व्यक्त केलं आहे. सध्या शैलेश लोढा यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शैलेश लोढा यांनी इन्स्टाग्रामवर वडिलांसोबत खास फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहे. पोस्टवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत.

वडिलांसोबत फोटो पोस्ट करत शैलेश लोढा म्हणाले, ‘आज मी जे काही आहे… ते फक्त तुमची सावली आहे… आज सकाळी सूर्याने जग प्रकाशीत केलं, पण आमच्या आयुष्यात पूर्णपणे काळोख आला आहे… वडिलांनी देह सोडला आहे… अश्रूंची भाषा असती तर काहीतरी लिहिलं असतं… पुन्हा एकदा बोला ना… बबलू…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शैलेश लोढा यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

 

 

शैलेश लोढा यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. शैलेश लोढा यांच्या पोस्टवर अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने देखील कमेंट केली आहे.

अभिनेत्री पोस्टवर कमेंट करत म्हणाली, ‘ओम शांती… स्वतःची काळजी घ्या…’, शिवाय सुनील पाल यांनी देखील शैलेश लोढा यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. वडिलांच्या निधनामुळे शैलेश लोढा यांच्या मनात मोठी पोकली निर्माण झाली आहे.