मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका गेल्या १४ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या फार जवळची आहे. गोकूळ धाम सिनेमातील एकी आणि टप्पू सेना यांची मस्ती अशा अनेक आनंददायी गोष्टीमुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. गेल्या काही दिवसांत मालिकेने अनेक चढ-उतार पाहिले, पण कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सोडलं नाही. मालिकेतील तारक मेहता, नट्टू काका, माधवी, अशा प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेतील आणखी एक पात्र म्हणजे ‘पोपटलाल’… ‘दुनिया हिला दुंगा…’ म्हणणारा पोपटलाल मालिकेत अविवाहित असून सोसायटीतील प्रत्येक जण पोपटलालचं लग्न कधी होईल या प्रतीक्षेत आहे.
मालिकेत अविवाहित आणि कंजूस दिसणार ‘पोपटलाल’ खऱ्या आयुष्यात मात्र कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. पोपटलाल म्हणजे अभिनेता श्याम पाठक कायम त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. पण आता पोपटलाल त्याच्या संपत्ती मुळे चर्चेत आला आहे. श्याम पाठक ‘पोपटलाल’ ही भूमिका साकारण्यासाठी तगडं मानधन घेतो. शिवाय अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपटलाल उर्फ श्याम पाठक याच्याजवळ जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ‘तारत मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका एपिसोडसाठी अभिनेता जवळपास ६० हजार रुपये मानधन घेतो. गेल्या १४ वर्षांपासून अभिनेता मालिकेत काम करत आहे.
पोपटलाल उर्फ श्याम पाठक फक्त मालिकेच्या माध्यमातून नाही तर, अनेक जाहिराती आणि कार्यक्रमांच्या माध्यामातून देखील पैसे कमावतो. शिवाय त्याच्याकडे महागडी कार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. श्याम पाठक याने एका चिनी सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेता कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.
मालिकेत लग्न करण्यासाठी मॅरेज ब्यूरोमध्ये सतत जाणारा पोपटलाल उर्फ श्याम पाठक खाऱ्या आयुष्यात सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिनेता वैवाहिक असून तीन मुलांचा वडील आहे. ४६ वर्षीय श्याम याच्या पत्नीचं नाव रश्मी पाठक असं आहे. श्याम पाठक याचं कुटुंब झगमगत्या विश्वापासून दूर आहे.