‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता बेपत्ता असल्याची तक्रार गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी पोलिसांत नोंदवली आहे. सध्या पोलीस अभिनेत्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अभिनेत्याबद्दल मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. निर्माते जेडी मजीठिया यांनी याप्रकरणी मोठी माहिती दिली आहे.
जेडी मजीठिया यांमा मिटिंगमध्ये असताना एक फोन आला होता. जेडी मजीठिया यांना आलेला फोन दुसरा तिसरा कोणाचा नाही तर, गुरुचरण सिंग यांची खास मैत्रीण भक्ती सोनी यांचा होता. भक्ती सोनी यांनी जेडी मजीठिया यांना फोन करुन गुरुचरण सिंग याच्याबद्दल सांगितलं.
गुरुचरण सिंग मुंबईत येणार होते. अभिनेता 22 एप्रिल रोजी दिल्ली येथून विमानासाठी घरुन निघाला होता. पण अभिनेता मुंबईत देखील पोहोचला नाही आणि अभिनेता पुन्हा घरी देखील गेला नाही. भक्ती सोनी अभिनेत्याला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर देखील पोहोचल्या होत्या. पण गुरुचरण सिंग मुंबईत आलाच नसल्याची माहिती मिळत आहे.
भक्ती सोनी यांनी विमानतळ अधिकाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतर अभिनेता विमानात बसलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. पण धक्कादाक गोष्ट म्हणजे विमानात बसण्यापूर्वी गुरुचरण सिंग यांनी भक्ती यांना ‘बोर्ड करण्यासाठी जात आहे…’ असा मेसेज केला होता. अशात अभिनेता विमात बसलाच नाही, मुंबईत उतरला नाही? तर अभिनेता गेला कुठे? यांसारखे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत.
निर्माते जेडी मडीठिया म्हणाले, ‘गुरुचरण सिंग याचे आई – वडील मुलाचा शोध घेत आहेत. पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल कण्यात आली आहे. गुरुचरण सिंग याचे आई – वडील वृद्ध आहे आणि ते सतत आजारी देखील असतात..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा रंगली आहे.
गुरुचरण सिंग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत होता. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण एक दिवस असा आला जेव्हा अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतला. निर्मात्यांसोबत काही वाद झाल्यानंतर गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता अचानक गायब झाल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.