सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या पहिल्या पतीसोबत तब्बूचे खास कनेक्शन; कोण आहे ‘हा’ अभिनेता?

| Updated on: Jan 22, 2023 | 11:55 AM

सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत लग्न त्यानंतर घटस्फोट, आता अभिनेत्री तब्बूसोबत खास कनेक्शन; कोण आहे 'हा' बॉलिवूडचा हिरो?

सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या पहिल्या पतीसोबत तब्बूचे खास कनेक्शन; कोण आहे हा अभिनेता?
सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या पहिल्या पतीसोबत तब्बूचे खास कनेक्शन; कोण आहे 'हा' अभिनेता?
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे कमी आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी चाहते देखील कायम उत्सुक असतात. आता चर्चा रंगत आहे अभिनेता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नात्याबद्दल. सलमाानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडच्या यादीतील एक नाव म्हणजे शाहीन बानो. पण शाहीन आणि सलमान यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहीन हिने अभिनेता सुमित सहगल याच्यासोबत लग्न केलं. ८० च्या दशकात सुमित सहगल हे नाव बॉलिवूडमध्ये प्रचंड प्रसिद्ध होते. सुमित सहगलला चॉकलेट हिरो म्हणून देखील ओळखलं जातं होतं. सुमित सहगल कायम त्याच्या खासगी आयुष्य आणि करियरमुळे चर्चेत राहिला.

 

सुमित सहगलने १९८७ साली ‘इंसानियत के दुश्मन’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. सुमित सहगलच्या पहिल्या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर १९८७ ते 1995 सुमित सहगलने जवळपास ३० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. सिनेमात मिळत असलेल्या यशानंतर सुमितने १९९० मध्ये शाहीन बानो हिच्यासोबत लग्न केलं.

शाहीनसोबत लग्न केल्यानंतर सुमित पुन्हा चर्चेत आला. सुमित सहगलने सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड शाहीन सहगल हिच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं देखील फार काळा टिकू शकलं नाही. लग्नाच्या ७ वर्षांनंतर म्हणजे २००३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर सुमितने फराह नाजसोबत लग्न केलं. फराह नाज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू हिची बहीण आहे. फराह नाज देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ९० च्या दशकात फराह नाजने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुमित सध्या पत्नी फराह नाजसोबत मुंबईत राहत आहे.