Tabu and Ajay Devgn: बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता अजय देवगन यांच्या मैत्रीबद्दल आज सर्वांना माहिती आहे. आजही दोघे एकमेकांसोबत अनेक सिनेमांमध्ये काम करतात. त्यांचं सिनेमे हीट देखील झाले आहेत. शिवाय दोघांना अनेक इव्हेंटमध्ये देखील एकत्र स्पॉट केलं जातं. सांगायचं झालं तर, तब्बू आणि अजय यांच्यातील मैत्री फार घट्ट आहे. दोघे कायम एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. पण एक दिवस असा देखील अला जेव्हा अजय याच्या लेकीला पाहताच तब्बूच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं.
एका मुलाखतीत खुद्द तब्बूने ते भावनिक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. अजयच्या लेकीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तब्बूच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. तब्बू म्हणाली, ‘अजयचं लग्न झालं… त्याला मुलगी झाली… मी चकित होती… याला मुलगी झाली? मला विश्वासच बसत नव्हता… त्यानंतर मी निसाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये पाणी होतं. माझ्या मित्राची मुलगी…’
तब्बू पुढे म्हणाली, ‘माझी आई देखील तेव्हा माझ्यासोबत होती. जेव्हा माझ्या आईने निसाला पाहिलं तेव्हा ती म्हणाली, ही तर हुबेहूब अजयची कार्बन कॉपी आहे…’, अजय आणि तब्बू यांच्या मैत्रीला आज अनेक वर्ष झाली आहेत. तब्बूचा भाऊ आणि अजय चांगले मित्र होते. भावाचा मित्र असल्यामुळे तब्बू आणि अजय यांच्यात देखील घट्ट मैत्री झाली.
सांगायचं झालं तर, अजय आणि तब्बू चांगले मित्र आहेत. पण एक काळ असा देखील होता जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. अशात अजय याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत संसार थाटला. काजोल आणि अजय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तब्बू मात्र आजही एकटीच आयुष्य जगतेय. यासाठी देखील तब्बूने अजय याला जबाबदार ठरवलं आहे…
‘माझा भाऊ समीर आर्या आणि अजय देवगन माझ्या शेजारी राहायचे. दोघांची माझ्यावर करडी नजर असायची… जर कोणता मुलगा माझ्या बाजूला जरी दिसला तरी दोघे त्याला धमकवायचे मारयचे… याच कारणामुळे मी आजही सिंगल आहे.’ असं तब्बू एका मुलाखतीत म्हणाली होती.