अभिनेत्री तब्बू ही तिच्या अष्टपैलु व्यक्तिमत्व आणि सदाबहार लूकसाठी नेहमीच इंडस्ट्रीत महत्त्वाची राहिली आहे. आता तिने पुन्हा एकदा आपल्या भूमिकेने सगळ्यांनी मने जिंकली आहेत. क्रू या चित्रपटातील गीता या भूमिकेतून तिने पुन्हा एकदा जगभरातील प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिने मजेशीर भूमिका साकारत चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नेटिझन्स आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळवली आहे. तिने कॅमेऱ्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.
एका युजरने सोशल मीडियावर तिची प्रशंसा केलीये, “प्रत्येक चित्रपटात तब्बू चमकते” तर दुसरा चाहता म्हणतो की, “तब्बू सर्वोत्कृष्ट आहे.” आणखी एकाने लिहिले की, “तब्बू संपूर्ण चित्रपटात चमकते”.
तब्बूला क्रूमध्ये तिची भूमिका वेगळा अनुभव देते. तिचे कौशल्य देखील या भूमिकेत दिसत आहे. तिचे योगदान केवळ चित्रपटातच भर घालत नाही तर इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिच्या स्थिती सिद्ध करते. राजेश ए कृष्णन दिग्दर्शित या कॉमेडीमध्ये करीना कपूर खान आणि क्रिती सॅनन यांच्याही भूमिका आहेत. तिघांच्या या त्रिकुटाने चित्रपटाच्या कथेला कॉमेडी आणि ग्लॅमरचा स्पर्श जोडला आहे.
करीना कपूर खानने देखील या सिनेमात चांगले काम केले आहे. संपूर्ण चित्रपटात तिचे एक्सप्रेशन अप्रतिम दिसत होते. दुसरीकडे इतक्या दिवसांनी तब्बूला ग्लॅमरस आणि वेगळ्या अवतारात पाहून चाहत्यांना आनंद झाला. तब्बूला याआधी लोकांनी पोलिसाच्या भूमिकेत पाहिले होते. या चित्रपटातील तिची आणि करिनाची जोडीही खूपच रंजक आहे. क्रिती सननने देखील या चित्रपटात चांगली भूमिका केली आहे.
चित्रपटाचे कास्टिंग मनोरंजक असले तरी कथा लोकांना तितकी आवडलेली दिसत नाहीय. 2 तास 3 मिनिटांचा हा चित्रपट अनेकांना कंटाळवाणा वाटला. चित्रपटातील गाणीही तशी खास चर्चेत आली नाहीत. दिलजीत दोसांझ आणि बादशाह यांनी एकत्र या सिनेमात काम केले आहे. पण तितके प्रभावी गाणे वाटली नाहीत.