ऐश्वर्या अन् अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा; निम्रत कौरनं शेअर केला ‘तो’ स्पेशल व्हिडीओ, म्हणाली जळले पाहिजे..

| Updated on: Nov 11, 2024 | 9:00 PM

बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तीच्या आणि अभिषेकच्या डेटिंगची चर्चा सुरू आहे, अशातच तीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ऐश्वर्या अन् अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा; निम्रत कौरनं शेअर केला तो स्पेशल व्हिडीओ, म्हणाली जळले पाहिजे..
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार सध्या निम्रत कौर ही अभिषेक बच्चनला डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आता निम्रत कौरचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तीनं म्हटलं आहे की, मैत्री अशी असावी की तुमच्याकडे बघून लोकांना हेवा वाटला पाहिजे, निम्रत कौरचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री निम्रत कौरने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या व्हिडीओमध्ये ती एक चागंली मैत्री कशी असते? याबाबत बोलताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये निम्रत कौर खाली जमिनीवर बसलेली दिसून येत आहे. ती एका ड्रेंडिंग डायलॉगवर लिप-सिंक करताना दिसत आहे. रील अभिनेत्रीने म्हटलं आहे की तुमची मैत्री इतकी मजबूत असावी की तुमच्याकडे बघून लोकांना हेवा वाटला पाहिजे.

व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना तीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, माझी आणि केसी करमचंदची मैत्री अशीच आहे.आपल्या बीएफला हा व्हिडीओ टॅग करा. या पोस्ट सोतब तीने फ्रेंडशिप, बीएफगोल्स, वीकेंडवाइब्स, पक्कादोस्त, ड्रेंडिंग रील्स अशाप्रकारचे हॅशटॅग देखील अॅड केले आहेत. सोबतच तीने राम दासन यांची एक पॉझिटिव्ह ओळ देखील या व्हिडीओसबत पोस्ट केली आहे.

 

अभिषेकसोबत डेटिंगची चर्चा

सध्या निम्रत कौर चांगलीच चर्चेत आहे. ती अभिषेक बच्चनला डेट करत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ते दोघं दसवी चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी एकत्र आले. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला.त्यानंतर अभिषेक आणि निम्रत कौर यांच्या अफेरच्या चर्चा सुरू झाल्या. निम्रत कौरमुळेच अभिषेक बच्च आणि ऐश्वर्या राय हे घटोस्फोट घेणार आहेत असा आरोप देखील तिच्यावर झाला. मात्र बच्चन कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीनं घटस्फोटाची चर्चा फेटाळून लावली आहे, ती फक्त एक अफवा असल्याचं त्याने म्हटलं आहे.

एकीकडे अभिषेक आणि निम्रत कौरच्या डेटिंगची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची देखील चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप अभिषेक बच्चनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये, अभिषेक आणि आपल्या नात्याबाबत बोलताना निम्रत कौरने म्हटलं की, लोकांना थांबवता येऊ शकत नाही, अफेअरची अफवा सुरूच राहणार आहे.