बॉलिवूडमधील आणखी एक प्रेम प्रकरण समोर; विजय वर्माला डेट करतेय तमन्ना भाटिया?

| Updated on: Jan 02, 2023 | 5:57 PM

त्या' एका व्हिडीओमुळे विजय वर्मा आणि तमन्ना भाटीया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडमधील आणखी एक प्रेम प्रकरण समोर; विजय वर्माला डेट करतेय तमन्ना भाटिया?
Tamannaah Bhatia - Vijay Varma यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; दोघे पहिल्यांदाच...
Follow us on

मुंबई : झगमगत्या विश्वात कायम चर्चाचे विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे एकमेकांसोबत असलेले खास कनेक्शन. बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील अशा दोन सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत ज्यावर चाहत्यांचा विश्वास देखील बसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्यात खास नातं असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. रिपोर्टनुसार दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं कळत आहे. दोघांनी बॉलिवूडचं नवीन कपल अशी देखील ओळख मिळाली आहे.

दरम्यान, तमन्ना आणि विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे डान्स करताना दिसत आहे. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. एवढंच नाही, तर तमन्ना-विजयने नव्या वर्षाचं स्वागत देखील एकत्र केल्याची चर्चा रंगत आहे.

 

 

सध्या दोघांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ गोवा येथील असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तमन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील विजयने अभिनेत्रीसोबत वेळ व्यतीत केला. २१ डिसेंबर रोजी अभिनेत्रीने मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. पण तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

तमन्ना आणि विजय यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर विजय लवकरच बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘बोल चुडिया’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.