Tamannaah Bhatia – Vijay Varma यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; दोघे पहिल्यांदाच…

| Updated on: Jan 18, 2023 | 2:31 PM

बॉलिवूडच्या नव्या कपलकडे सर्वांच्या नजरा; डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्यानंतर तमन्ना - विजय यांनी असं काय केलं ज्यामुळे चाहत्यांच्या हटत नाहीत नजरा

Tamannaah Bhatia - Vijay Varma यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; दोघे पहिल्यांदाच...
Tamannaah Bhatia - Vijay Varma यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; दोघे पहिल्यांदाच...
Follow us on

Tamannaah Bhatia – Vijay Varma : झगमगत्या विश्वात कायम चर्चाचे विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे एकमेकांसोबत असलेले खास कनेक्शन. बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील अशा दोन सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत ज्यावर चाहत्यांचा विश्वास देखील बसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्यात खास नातं असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. नवं वर्षाचं स्वागत देखील दोघांनी एकत्र गोवा याठिकाणी केल्याचें फोटो आणि व्हिडीओतून सर्वांच्या समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांना पहिल्यांदा एकत्र सर्वांसमोर स्पॉट करण्यात आलं आहे . तमन्ना आणि विजय यांना एकत्र वांद्रे याठिकाणी स्पॉट करण्यात आलं. रिपोर्टनुसार दोघे लंच डेटला गेल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांनी कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज दिली नसली तरी, नव्या वर्षांत दोघांना पहिल्यांदा एक एकत्र दिसले आहेत.

 

 

आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तमन्ना काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तर विजय निळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसत आहे. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मुंबई याठिकाणी पुन्हा तमन्ना आणि विजय यांना एकत्र पाहिल्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची शक्यता चाहत्यांच्या मनात दाट झाली आहे.

दरम्यान, तमन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील विजयने अभिनेत्रीसोबत वेळ व्यतीत केला. २१ डिसेंबर रोजी अभिनेत्रीने मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. पण तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

तमन्ना आणि विजय यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर विजय लवकरच बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘बोल चुडिया’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.