मुंबई : तापसी पन्नू (Tapasi Pannu) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि वेगवेगळ्या विषयावर ती आपले मत मांडत असते. नुकताच तापसीने एक ट्विट केले आहे त्यामधून तिने आता कंगना रनाैतवर (Kangana Ranaut) निशाना साधला आहे. तापसाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, चला आता कोरोनावरही उपचार आहे पण गैरसमज आणि ओवर कॉन्फिडेंस याचा काहीच उपचार नाही म्हणत तिने कंगनाला टा्र्गेट केले आहे. (Tapasi Pannu targets Kangana Ranaut)
मात्र, आता तापसीच्या या ट्विटला कंगना काय प्रतिउत्तर देते हे बघण्यासारखे आहे. तापसीच्या या ट्विटवर एका वापरकर्त्याने तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत म्हणाला सर्वांचाच उपचार लवकर होईल. त्यावर उत्तर देताना तापसी म्हणाली की, सर काळजी घेत आहे म्हणूनच व्यवस्थित आहे नाहीतर काही लोकांचा प्रयत्नच सुरू आहे मानसिक संतूलन खराब करायचा आणि धन्यवाद माझी काळजी केल्याबद्दल.
Sir take care ka hi toh nateeja hai ki hum jaise thode bohot abhi satke nahi hai varna kuch logo ki koshish jaari hai maansik santulan hilaane ki. Vaise aap ki shubhchinta aur dhyaan ke liye dhanyavaad. Aap jab tak hai humein apni sehat aur sanmati pe poora Vishwas rahega. https://t.co/rLnb7V3S20
— taapsee pannu (@taapsee) January 4, 2021
तापसी लवकरच रश्मी रॉकेट चित्रपटात दिसणार आहे. ‘रश्मी रॉकेट’ बद्दल बोलायचे झाले तर आकर्ष खुराना हे चित्रपट दिग्दर्शन करीत आहेत. रश्मी रॉकेटमध्ये गुजरातमधील कच्छ येथील रहिवाशी रश्मीची कथा असून ती तिच्या मित्रांमध्ये रॉकेट म्हणून ओळखली जाते. अॅथलीट होण्यासाठी रश्मीने खूप संघर्ष केला आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी फिल्म्सद्वारे केली जात आहे.
रियाच्या समर्थनात उतरलेल्या बॉलिवूडच्या फळीमध्ये तापसी पन्नूचाही समावेश होता. रियाने ड्रग्ज घेतल्याचा उल्लेख एनसीबीच्या रेकॉर्डवर नसल्याच्या बातमीचे ट्वीट ‘कोट’ करुन तपासीने आपले मत मांडले होते. “करेक्शन. ती (ड्रग्जचे) सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग (पुरवठा) करत होती. म्हणजे, जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल. सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय… हेच आहे. आपण करुन दाखवलं’ असं तापसीने लिहिलं होते. तापसीने ट्वीट केल्यानंतर काही काळ ती ट्विटरवर ट्रेंडमध्ये होती. मात्र सुशांतच्या चाहत्यांना तिचे मत न रुचल्याने ते सोशल मीडियावरुन तिच्यावर तुटून पडले होते.
संबंधित बातम्या :
अक्षयसोबत राम सेतूची घोषणा करुन यशराजचे निर्माते फसले, आदित्यने दाखवला घरचा रस्ता…
जान्हवी कपूरने जुहूमध्ये खरेदी केलंय नवं आलिशान घर, किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
(Tapasi Pannu targets Kangana Ranaut)