तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी गुरुचरण सिंग हा निघाला होता. मात्र, गुरुचरण सिंग हा मुंबईला पोहचलाच नाही. दिल्लीच्या पालम परिसरातील एका सीसीटीव्हीमध्येही गुरुचरण सिंग हा कैद झालाय. हेच नाही तर 22 एप्रिलला बेपत्ता झाल्यानंतर अभिनेत्याच्या एटीएमवरून 24 एप्रिलला सात हजार रूपये काढण्यात आले. गुरुचरण सिंगचे अपहरण झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. मात्र, अजूनही गुरुचरण सिंगबद्दल काही समजू शकले नाहीये.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत असल्याचे देखील सांगितले जातंय. हेच नाही तर गुरुचरण सिंग हा मानसिक तणावात असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. आता गुरुचरण सिंग याची एक जुनी मुलाखत चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. यावरून हे कळतंय की, गुरुचरण सिंग हा कधीच हार मानणाऱ्यांपैकी नाहीये.
गुरुचरण सिंग हा मुलाखतीमध्ये सांगताना दिसतोय की, माझ्या आयुष्यात खूप जास्त आणि मोठ्या अडचणी आल्या. असे होते की, दररोज एक एक गोष्ट विकली जात होती. आमच्याकडे अजिबातच पैसे राहिले नाहीत. हेच नाही तर हळूहळू करून कर्जाचा डोंगर वाढत होता. मलाही मनातून त्या लोकांचे पैसे द्यायचे होते, परंतू पैसेच अजिबात नव्हते.
आमचा एक फ्लॅट होता, परंतू त्याच्यावरही वाद सुरू होता. मी एकदिवशी लाजपत नगरच्या रस्त्यावर उभे राहून देवाला म्हटलो की, जर तुम्हाला वाटते की, मी लोकांचे पैसे देऊ शकत नाही तर मला मारून टाका. पण मी कधीच आत्महत्या करणार नाही. मी हार मानणार नाही. तेवढ्याच वेळात मला दुकानदाराने आवाज दिला आणि म्हटले की, कोणीतरी व्यक्ती तुला शोधत आहे.
त्यानंतर मी दुकानदाराकडून फोन नंबर घेत त्या व्यक्तीला फोन केला तर तो व्यक्ती म्हणाला की, मला तुमचा फ्लॅट खरेदी करायचा आहे. त्यानंतर माझ्याकडे पैसा आला आणि मग मी लोकांचे सर्व पैसे देऊ टाकले. अवघ्या 25 दिवसांच्यात आत लोकांचे सर्व पैसे देऊन टाकले. देवावर विश्वास ठेवणे महत्वाचे असल्याचे गुरुचरण सिंग म्हणताना दिसतोय. आता त्याची ही मुलाखत चर्चेत आलीये.