तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा 22 एप्रिल 2024 पासून बेपत्ता आहे. पोलिस गुरुचरण सिंगचा शोध घेत आहेत. अजूनही पोलिसांच्या हाती कोणतीच महत्वाची माहिती लागली नाहीये. गुरुचरण सिंग हा आपल्या घरातून मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र, तो विमानतळाकडे गेलाच नाही. हेच नाही तर दिल्लीच्या पालम परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये गुरुचरण सिंग हा शेवटचा दिसला. गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ बघायला मिळतंय. पोलिस सतत त्याचा शोध घेताना देखील दिसत आहेत.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. मध्यंतरी काही रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला की, गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत सापडला होता. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गुरुचरण सिंग 2020 मध्ये सोडली. त्यानंतर त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. यामुळेच तो तंगीत असल्याचे सांगितले जाते.
आता नुकताच गुरुचरण सिंगच्या वडिलांनी मोठा खुलासा केलाय. गुरुचरण सिंगचे वडिल म्हणाले, त्याच्या आर्थिक तंगी किंवा आर्थिक परिस्थितीबद्दल मला काहीच माहिती नाहीये. कारण तो कधी याबद्दल काहीच बोलला नाही. सध्या माझे वय असे आहे की, तब्येत ठिक राहत नाही. गुरुचरण सिंगला बेपत्ता होऊन आता बरेच दिवस झाले आहेत.
आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये. आम्ही फक्त त्याच्या वापस येण्याची वाट पाहत आहोत. दिल्लीत पोलिसांकडून या प्रकरणातील तपास सुरू आहे. मात्र, पोलिसांना अजूनही म्हणावी तशी काहीच माहिती गुरुचरण सिंगबद्दल मिळताना दिसत नाहीये. गुरुचरण सिंगच्या शोधात अनेक पथके देखील तयार करण्यात आलीये.
आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना एक हैराण करणारी माहिती मिळाली आहे. गुरुचरण सिंगचे एकपेक्षा अधिक जीमेल अकाऊंट आहेत. गुरुचरण सिंगने दिल्लीच्या एक एटीएमवरून सात हजार रूपये देखील काढले होते. गुरुचरण सिंगसाठी त्याचे चाहते हे प्रार्थना करताना दिसत आहेत. गुरुचरण सिंग हा सोशल मीडियावर चांगला सक्रिय होता आणि त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते.