‘तारक मेहता…’ फेम ‘या’ अभिनेत्रीला बॉयफ्रेंड करायचा मारहाण, सतत टॉर्चर केल्यामुळे…

| Updated on: Nov 12, 2023 | 1:10 PM

tarak mehta ka ooltah chashmah : परदेशात सुट्ट्यांसाठी गेलेल्या अभिनेत्रीला एक्स - बॉयफ्रेंडने केली होती मारहणा... जवळच्या मैत्रिणीकडून धक्कादायक सत्य समोर... 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत

तारक मेहता... फेम या अभिनेत्रीला बॉयफ्रेंड करायचा मारहाण, सतत टॉर्चर केल्यामुळे...
Follow us on

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी रिलेशिनशिपमध्ये आणि वैवाहिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. खासगी आयुष्यात आलेल्या संकटांवर अभिनेत्री मात केली, पण आठवणी मात्र कधीही पूसता येत नाही. आपल्या खासगी आयुष्यात घडलेल्या चांगल्या – वाईट गोष्टींचा खुलासा अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मूनमून दत्ता म्हणजेच ‘बबीता जी’ आहे. मूनमून दत्ता अद्यापही अविवाहित आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्यात अनेक वाईट गोष्टींचा सामना केला.

मूनमून दत्ता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मूनमून हिच्या एक्स – बॉयफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर मूनमून हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली याला डेट केलं आहे. 2008 मध्ये मूनमून आणि अरमान यांच्यामध्ये प्रेम बहरलं.

दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. पण मूनमून आणि अरमान यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मूनमून आणि अरमान यांच्यामध्ये व्हेलेंटाईन डेच्या दिवशी वाद झाले होते. याच दरम्यान, अरमान याने मूनमून हिची मारहाण केल्याची चर्चा रंगली.

अरमान याने मारहाण केल्याप्रकरणी मूनमून हिने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. मूनमून दत्ता आणि अरमान कोहली यांच्यातील भांडणांना दुजोरा अभिनेत्री डॉली बिंद्रा हिने दिला होता. डॉली म्हणाली, ‘परदेशात सुट्ट्यांसाठी गेलेल्या मूनमून हिची अरमान रोज मारहाण करायचा…’ मूनमून कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

‘तरक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील मूनमून हिची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडते. पण काही दिवसांपासून ‘तरक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.

मूनमून दत्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. खुद्द मूनमून सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मूनमून कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.