Bigg Boss 16 | नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचे दिसले खरे चेहरे

| Updated on: Nov 09, 2022 | 1:47 PM

काही दिवसांपासून सतत टीना, शालिन आणि सुंबुलमध्ये खटके उडत होते.

Bigg Boss 16 | नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचे दिसले खरे चेहरे
Follow us on

मुंबई : बिग बॉस 16 च्या घरात जोरदार हंगामा होताना दिसत आहे. हळूहळू स्पर्धेकांचे खरे चेहरे लोकांच्या समोर येत असून मैत्रीमध्येही फूट पडताना दिसत आहे. काही दिवसांपासून सतत टीना, शालिन आणि सुंबुलमध्ये खटके उडत होते. शेवटी आता एका टास्टमुळे यांनी आपल्या मनातील भडास बाहेर काढलीये. बिग बाॅसच्या घरात सुंबुल आणि शालिनमध्ये कडाक्याची भांडणे बघायला मिळाली. नाॅमिनेशन टास्क नुकताच बिग बाॅसच्या घरात पार पडला आहे.

दुसरीकडे अर्चना गाैतम काहीही कारण नसताना घराचा कॅप्टन अब्दूला त्रास देताना दिसत आहे. यावेळी घरातील जवळपास सर्वच सदस्य अब्दूच्या बाजूने उभे राहिले आणि अर्चनाला असे वागू नको सांगतात. मात्र, अर्चना कोणीही कॅप्टन असो त्रास देत म्हणजे देतेच.

बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन असल्याने अब्दूला एक विशेष अधिकार मिळतो आणि बिग बाॅस अब्दूला म्हणतात की, घरातील कोणत्याही चार सदस्यांना या आठवड्याच्या नाॅमिनेशन प्रक्रियेपासून तू वाचू शकतो, जे तुझे आवडते आहेत. यावेळी अब्दू साजिद खान, निम्रत काैर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरेचे नाव घेतो. या चार जणांना अब्दू नाॅमिनेशनपासून वाचवतो.

बिग बाॅस या आठवड्याची नाॅमिनेशन प्रक्रिया सुरू झाल्याचे बिग बाॅसच्या घरातील सर्व सदस्यांना सांगतात. कॅप्टनच्या विशेष अधिकाराचा वापर करून अब्दू साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि निम्रत काैर यांना वाचवो हे घरातील सर्व सदस्यांना सांगतात.