घरात त्रास देतात म्हणून ती बाहेर पडली, बाहेर पडली म्हणूनही त्रास देणार? अरुंधतीचा त्रास प्रत्येक महिलेची रोज की कहानी?

| Updated on: Mar 08, 2022 | 1:02 PM

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या सोमवारच्या भागात प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. अरुंधतीने (Arundhati) देशमुखांचं घर सोडून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला असला तरी तिचा हा प्रवास काही तितका सोपा नसणार आहे, हे वारंवार मालिकेच्या कथेतून दिसून येतंय.

घरात त्रास देतात म्हणून ती बाहेर पडली, बाहेर पडली म्हणूनही त्रास देणार? अरुंधतीचा त्रास प्रत्येक महिलेची रोज की कहानी?
Aai Kuthe Kay Karte episode updates
Image Credit source: Hotstar
Follow us on

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या सोमवारच्या भागात प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. अरुंधतीने (Arundhati) देशमुखांचं घर सोडून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला असला तरी तिचा हा प्रवास काही तितका सोपा नसणार आहे, हे वारंवार मालिकेच्या कथेतून दिसून येतंय. एकीकडे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री आणि दुसरीकडे तिचं एकटं राहणं अशा दोन्ही गोष्टींवरून तिच्याच मुलाने, अभिषेकने तिला बरंवाईट ऐकवलं. अरुंधती ज्या गोष्टींसाठी अजूनही लढतेय, ते मात्र त्याला अजूनही समजत नाही. त्यामुळे बेताल बोलणाऱ्या अभिषेकला आता अरुंधतीने चांगलाच धडा शिकवला आहे. अनघा आणि आशुतोषसमोरच तिने अभिषेकच्या कानशिलात लगावली आहे. घटस्फोटानंतरही अरुंधतीला तिच्या मनासारखं वागता येत नाही, वागली तरी त्यावर तिला अनेकांचे टोमणे ऐकावे लागत आहेत. या सर्वांत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता ती पूर्वीसारखी खचली नाही. मुलाच्याच तोंडून बरंच काही ऐकल्यानंतर तिने स्वत:मध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न केला नाही. तर उलट त्याच्या कानाखाली वाजवून त्याचं तोंड बंद केलं.

“एकदा एक बाई आई झाली की तिला स्वत:चा विचार नसतो”

अनिरुद्धने अरुंधतीला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र तिला सून अनघाची नेहमीच साथ मिळाली. अनघा जरी अरुंधतीच्या पाठिशी असली तरी अभिषेक मात्र अनिरुद्धप्रमाणेच वागत असल्याचं पहायला मिळत आहे. अरुंधतीच्या नव्या घरात येऊन तो तिला खूप काही सुनावतो. “आई असं नाही वागत, या वयात तुझं असं एकटीनं राहणं, तुझा मित्र असणं, कोणती आई अशी करते? नातवंडं खेळवण्याचे दिवस आहेत तुझे, हे सोडून कुठे एकटी राहतेस तू? का इथेच तुझा मित्र असणार आहे तुझ्यासोबत? अॅम्बिशियस असण्याचं हे तुझं वय आहे का? लोकांना सक्सेक आवडत नाही. कालपर्यंत बिचारी असलेली अरुंधती जोगळेकर बाई आज सक्सेसफुल झाली, की लोक नावं ठेवायला लागतील. आपण आपल्या समाजातले नियम बदलू शकत नाही. आपल्याला ते पाळावे लागतात. हे आज नाही, पूर्वीपासून होत आलंय. एकदा एक बाई आई झाली की तिला स्वत:चा विचार नसतो. ते तसं व्हायचं नसेल ना, तर बाईने आई होऊ नये. आई स्वार्थी होऊ शकत नाही. आई मुलांना सोडून एकटी राहायला नाही जात,” अशा शब्दांत तो त्याचा राग व्यक्त करतो. यावेळी तो आशुतोषलाही टोमणे मारतो. अभिषेकच्या याच विचारांचा राग अरुंधतीला येतो, तिचा संयम सुटतो आणि ती अभिषेकच्या कानशिलात लगावते. इतकंच नाही तर पुन्हा कधी माझ्या घरी यायचं नाही, असंही ती अभिषेकला खडसावते.

दुसरीकडे अरुंधतीचा अभिषेकने केलेला अपमान हा आशुतोषलाही सहन झाला नाही. म्हणून तो स्वत: देशमुखांच्या घरी जातो आणि तिथेही त्याची अनिरुद्धसोबत बाचाबाची होते. मालिकेच्या आगामी भागांत याच बाचाबाचीदरम्यान आशुतोष देशमुखांसमोर अरुंधतीवरचं त्याचं प्रेम व्यक्त करतो.

हेही वाचा:

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?