मुंबई : उर्फी जावेद ही कायमच तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबात होत नाही. उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादात अडकते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच चक्क च्युईंगमचा शर्ट (Shirt) घातला होता. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये तिच्या फॅशनमुळे एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये.
विशेष म्हणजे उर्फी जावेद ही महिन्याला तगडी कमाई करताना देखील दिसते. उर्फी जावेद हिला 40 लाख लोक हे सोशल मीडियावर फाॅलो करताना दिसतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत उर्फी जावेद हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका देखील केली जाते. इतकेच नाही तर तिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात.
काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद ही लाठीचार्जच्या ड्रेसमध्ये दिसली होती. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. या लूकमध्ये उर्फी जावेद हिने चक्क पोलिसांच्या लाठीचार्जचा ड्रेस घातला होता. आपल्या संरक्षणासाठी आपण अशा पध्दतीचा ड्रेस घातल्याचे उर्फी जावेद हिने अगोदरच स्पष्ट केले होते.
नुकताच उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही चहा पिताना दिसत आहे. मात्र, उर्फी जावेद हिला चहा पिण्याची खूप जास्त इच्छा असूनही ती चहा पिऊ शकत नाहीये. चहा पिण्यासाठी किती जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे उर्फी जावेद हिच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
उर्फी जावेद हिने लाठीचार्जचा ड्रेस घातल्यामुळे तिला चहा पिता येत नाहीये. प्रत्येक प्रयत्न चहा पिण्यासाठी उर्फी जावेद ही करताना दिसत आहे. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. एकाने लिहिले की, स्ट्रॉचा याच्यासाठीच तयार झालीये. यावर उर्फी जावेद हिने उत्तर देत लिहिले की, गरम चहामध्ये स्ट्रॉ टाकून कसे पिणार? उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.