Sudha Chandran | ‘विमानतळावर सतत रोखलं जातं, वाईट वाटतं’, अभिनेत्री सुधा चंद्रन यांची पंतप्रधान मोदींना विनंती!

| Updated on: Oct 22, 2021 | 11:09 AM

प्रख्यात टीव्ही अभिनेत्री आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन (Actress Sudha Chandran) यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली की, त्यांच्यासारख्या अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्ड जारी करा, जेणेकरून विमानतळ प्रशासनाकडून ग्रिल जारी केले जातील.

Sudha Chandran | ‘विमानतळावर सतत रोखलं जातं, वाईट वाटतं’, अभिनेत्री सुधा चंद्रन यांची पंतप्रधान मोदींना विनंती!
Sudha Chandran
Follow us on

मुंबई : प्रख्यात टीव्ही अभिनेत्री आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन (Actress Sudha Chandran) यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली की, त्यांच्यासारख्या अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्ड जारी करा, जेणेकरून विमानतळ प्रशासनाकडून ग्रिल जारी केले जातील. सुधा चंद्रन यांनी हे आवाहन पंतप्रधान मोदींना एका व्हिडिओद्वारे केले आहे, जे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे.

अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या एका पायात समस्या आहे, ज्यामुळे त्या कृत्रिम पायचा वापर करतात. सुधा यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यात त्यांनी प्रत्येक वेळी विमानतळाच्या सुरक्षा तपासणीतून जाताना आपले कृत्रिम अवयव काढून ठेवण्याचा त्रास शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, असे प्रत्येक वेळी विमानतळावर सुरक्षेसाठी ग्रील केला जातो, ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो.

जाणून घ्या सुधा चंद्रन या व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या?

आपल्या व्हिडीओमध्ये सुधा चंद्रन यांनी पीएम मोदींना आवाहन केले आणि म्हटले की, ‘मी सुधा चंद्रन आहे, पेशाने अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. मी माझ्या कृत्रिम अवयवांसह नृत्य केले आहे आणि माझ्या देशाला अभिमान वाटावा असा इतिहास घडवला आहे, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा मी माझ्या व्यावसायिक भेटीसाठी बाहेर जाते, तेव्हा मला विमानतळावर थांबवले जाते. जेव्हा मी सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्यांना विनंती करते, की माझ्या कृत्रिम अवयवांची ईटीडी (एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर) चाचणी करा, तरीही ते माझे कृत्रिम अवयव काढायलाच लावतात.’

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘मोदीजी हे मानवतेच्या दृष्टीने योग्य आहे का? हा आपला देश कशाबद्दल बोलत आहे? आपल्या समाजात एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला हा मान देते का? मोदीजींना माझी नम्र विनंती आहे की कृपया आम्हाला देखील ज्येष्ठ नागरिकांसारखे कार्ड द्या.’

पाहा व्हिडीओ :

विमानतळावरच शूट केला व्हिडीओ

यासह, सुधा चंद्रन यांनी आशा व्यक्त केली की, त्यांच्या आवाहनाचा विचार केला जाईल आणि त्यावर नक्कीच काही कारवाई केली जाईल. सुधा चंद्रन यांचा हा व्हिडीओ पाहून असे वाटते की, त्यांनी विमानतळाच्या बाहेरच तो शूट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सुधा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हे अतिशय वेदनादायी आहे… प्रत्येक वेळी या ग्रिलमधून जाणे खूप दुःखदायक आहे… आशा आहे की माझा संदेश राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि लवकरच कारवाई होईल अशी आशा आहे.’

हेही वाचा :

करण जोहरचा आयकॉनिक चित्रपट पाहून भडकल्या होत्या शबाना आझमी, फोन करून सुनावले खडे बोल!

Top 5 Romantic Web Series : रोमँटिक सीरीज पाहायला आवडतात? मग, ओटीटीवरील ‘या’ खास सीरीज नक्की पाहा!