मुंबई : बिग बाॅस 16 ला त्याचा विजेता मिळाला आहे. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 (Bigg Boss 16)चा विजेता झाला असून शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुरूवातीला सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती की, शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 चा विजेता होईल. मात्र, प्रत्यक्षात सर्व उलटे झाले आणि एमसी स्टॅन हा बिग बाॅग 16 चा विजेता झाला. सुरूवातीला बिग बाॅसच्या घरात एमसी स्टॅन शांत राहायचा आणि कोणालाच बोलायाचा नाही. त्यानंतर तो मंडळीसोबत राहत होता. साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन (MC Stan), अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांचा एक ग्रुप झाला. यांची मैत्री इतकी जास्त झाली की, थेट शिव ठाकरे याला बिग बाॅस 16 ची ट्रॉफी द्यायची असे अनेकदा एमसी आणि निम्रत काैर म्हणताना दिसले होते. अनेकदा घरातील काही सदस्यांनी यांची मैत्री तोडण्याचा देखील प्रयत्न केला.
निम्रत काैर ज्यावेळी बिग बाॅस 16 मधून बाहेर जात होती, त्यावेळी ती म्हणाली होती की, काहीही झाले तरीही बिग बाॅस 16 ची ट्रॉफी मंडळीकडेच राहिला हवी. शेवटी तेच झाले आणि एमसी स्टॅन हा विजेता झाला.
एमसी स्टॅन अनेकदा बिग बाॅसच्या घरात असताना म्हणताना दिसला की, मला बिग बाॅसच्या ट्रॉफीची काहीच गरज नाहीये. माझा भाऊ शिव ठाकरे याला खऱ्या अर्थाने या ट्रॉफीची गरज आहे आणि त्याचे हे स्वप्न आहे.
बिग बाॅसच्या घरात असताना अर्चना गाैतम आणि शालिन भनोट याच्यासोबत झालेल्या भांडण्यानंतर एमसी स्टॅन अनेकदा शिव्या देताना दिसला होता. इतकेच नाही तर अर्चनासोबत भांडणे झाल्यावर त्याने थेट बिग बाॅसच्या घरातील साहित्याची मोडतोड केली होती.
अनेकदा मला बिग बाॅसमधून बाहेर पडायचे म्हणताना देखील एमसी स्टॅन दिसला. अर्चना गाैतमच्या वादानंतर बिग बाॅसने एमसी स्टॅन याला अनेक आठवडे हे नाॅमिनेशनमध्येही टाकले होते. बऱ्याच वेळा एमसी स्टॅन हा घरामध्ये टास्क देखील खेळत नव्हता.
एमसी स्टॅन याची बाहेर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. एमसी स्टॅन हा विजेता झाल्यानंतर शिव ठाकरे याने त्याला उचलून घेतले. बिग बाॅसच्या इतिहासामध्ये हे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळाले. बिग बाॅसची ट्रॉफी थोडक्यात हातातून गेल्यावरही एमसी स्टॅनला उचलून घेत डान्स करताना शिव ठाकरे दिसला.