मुंबई : बाॅलिवूड अभिनेते आणि निर्माता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन 9 मार्च रोजी झाले. सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या होळी पार्टीमध्ये 7 मार्चला धमाल करताना सतीश कौशिक हे दिसले होते. मुंबईतील (Mumbai) पार्टीनंतर ते दिल्ली येथे होळी सेलिब्रेट करण्यासाठी गेले आणि तिथे त्यांचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बाॅलिवूड (Bollywood) विश्वावर मोठा शोककळा पसरली आहे. चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. विकास मालू यांच्या पत्नीने या प्रकरणात काही मोठे आणि गंभीर खुलासे देखील केले आहेत. मात्र, यावर शशी कौशिक यांनीही मोठी माहिती सांगत. या वादामध्ये सतीश कौशिक यांना ओढू नका असे म्हटले आहे.
सतीश कौशिक यांच्यानंतर आता अजून एका निर्मातेचे निधन झाले आहे. सीआयडी या टीव्ही मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पर यांचे निधन झाले आहे. त्यांनी सिंगापूर येथे शेवटा श्वास घेतला आहे. सीआयडी मालिकेचे एसीपी प्रद्युम्न उर्फ शिवाजी साटम यांनी ही दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Pradeep Uppoor , ( the maker , pillar of CID ) ….. an ever smiling dear friend , honest & upfront , magnanimously generous to the core ??..… a long long wonderful chapter of my life comes to an end with your exit Boss ???…love you & miss you buddy ??? pic.twitter.com/eKvOuWmYnc
— shivaji satam (@shivaajisatam) March 13, 2023
शिवाजी साटम यांनी प्रदीप उप्पर यांच्या निधनाची बातमी देत त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. सीआयडी मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शिवाजी साटम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सीआयडीचे आधारस्तंभ आणि निर्माते प्रदीप उप्पर … नेहमी हसतमुख, प्रामाणिक आणि मनाने खूप उदार… तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक मोठा अद्भुत अध्याय संपला…..
आता शिवाजी साटम यांची ही पोस्ट सोशस मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करण्यास सुरूवात केल्या आहेत. चाहत्यांनी शिवाजी साटम यांच्या या पोस्टवर कमेंट करत प्रदीप उप्पर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबत सीआयडी मालिकेतील इतरीही कलाकारांनी प्रदीप उप्पर यांच्या आठवणीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.