दुसऱ्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर श्वेता तिवारीच्या मुलाला बसला धक्का, म्हणाली- तो अशा गोष्टी बोलतो की…

| Updated on: Aug 30, 2024 | 4:45 PM

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेसमुळे तर चर्चेत राहतेच पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही बऱ्याचदा चर्चेत राहते. श्वेता तिवारीने एका मुलाखतीत म्हटले की, तिचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर याचा तिच्या मुलावर वाईट परिणाम झाला आहे. श्वेता तिवारीने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

दुसऱ्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर श्वेता तिवारीच्या मुलाला बसला धक्का, म्हणाली- तो अशा गोष्टी बोलतो की...
Follow us on

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री ज्या आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतात त्या यादीत श्वेता तिवारीचे देखील नाव आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी श्वेता तिवारी आज इतकी लोकप्रिय आहे की आजही तिला प्रत्येक घरात प्रेरणा या नावाने ओळखले जाते. श्वेता तिवारीचे प्रोफेशनल लाईफ जेवढे चर्चेत होते तितकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत आहे. श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीसोबत विवाह केला होता. लग्नानंतर दोघांना एक मुलगी (पलक तिवारी) झाली पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा इतका वाढला की 2007 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्वेताने राजा चौधरी यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.

राजा चौधरीपासून वेगळे झाल्यानंतर श्वेताने 13 जुलै 2013 रोजी तिचा प्रियकर अभिनव कोहलीसोबत विवाह केला. सुरुवातीची काही वर्ष दोघांचं नातं चांगलं राहिलं पण मुलगा झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. श्वेतानेही अभिनवपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मुलगा रेयांशच्या ताब्यासाठी दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले. रेयांशला सोबत ठेवण्यासाठी श्वेताला अनेक त्रास सहन करावे लागले कारण अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, अभिनवने श्वेताचा छळ सुरू केला होता. रेयांश अजूनही श्वेतासोबत असला तरी तिचे आयुष्य अजूनही पूर्वीसारखे राहिलेले नाही.

श्वेता तिवारीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत श्वेता तिच्या मुलाची अवस्था सांगतेय. श्वेता म्हणते की तिचा मुलगा 7 वर्षांचा झाला आहे पण तो अशा गोष्टी बोलतो. तो ज्या प्रकारे गप्प बसतो ते चांगले नाही पण आता काय करता.

या व्हिडिओवर यूजर्स भरुपूर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटले की, त्याला वडिलांची गरज आहे. तर दुसऱ्या युजरने श्वेताला ट्रोल करत म्हटले की, आई-वडिलांच्या दोघांच्या प्रेमाची गरज आहे, दोघांनी लग्न करावे, तर तिसऱ्या यूजरने म्हटले की, आई-वडील भांडतात आणि नंतर घटस्फोट घेतात, पण मुलांना सर्व काही सहन करावे लागते.