मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला. बालकलाकार म्हणून तुनिशा शर्मा हिने आपल्या करिअरची सुरूवात केली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेमध्ये तुनिशासोबतच मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान (Sheezan Khan) याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुनिशा शर्मा हिच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान खान याला अटक करण्यात आली. २४ डिसेंबरपासून शीजान खान हा कोठडीमध्येच आहे. अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमधील दोन्ही मुख्य कलाकार नसल्यामुळे मालिका काही दिवसांसाठी बंद होईल, असे सांगण्यात येत होते.
२४ डिसेंबरला तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेतला होता. अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेचे काही एपिसोड अगोदरच तयार असल्याने ते प्रसारित करण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला.
सेटवर तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्याने भीतीचे वातावरण असल्याने निर्मात्यांनी मालिकेचा सेट इतर ठिकाणी स्थलांतरीत केला. नव्या जोमाने काही दिवसांमध्ये परत एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केली.
तुनिशा आणि शीजान हे दोघेही मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याने यांच्या जागी कोण पात्र साकारणार हा मोठा प्रश्न काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. आता यावरही मालिकेच्या निर्मात्यांना निर्णय घेतला आहे.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान हा देखील परत मालिकेमध्ये दिसणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. खरोखरच शीजानसाठी मालिकेची दरवाजे बंद करण्यात आली आहेत.
आता शीजान खान हा अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये दिसणार नाहीये. विशेष म्हणजे शीजान ऐवजी आता अभिषेक निगम दिसणार आहे. शीजान खान याच्या पात्राला अभिषेक निगम रिप्लेस करणार आहे.
अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेचे निर्माते कोणत्याही परिस्थितीमध्ये मालिकेचे शूटिंग थांबू इच्छित नाहीयेत. शीजान खान अजूनही कोठडीमध्ये आहे. तुनिशा शर्मा हिच्या वकिलाने शीजान खान याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.