मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा ही अशाप्रकारे जगाचा निरोप घेईल, असा कोणीही विचार केला नव्हता. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मालिकेच्या शूटिंगच्या सेटवरच गळफास घेत तिने आपली जीवनयात्रा संपली आहे. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे. तुनिशाच्या आईने अलीबाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेतील तुनिशाचा सहकलाकार शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शीजान खान आणि तुनिशा हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 15 दिवसांपूर्वीच तुनिशाचे शीजानसोबत ब्रेकअप झाले होते. तुनिशा हीने देखील शीजानच्याच मेकअप रूममध्ये फाशी घेतली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आले.
तुनिशा शर्मा हीने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला सांगितले होते की, शीजानसोबत तिचे ब्रेकअप झाल्याचे. शीजानसोबत ब्रेकअप झाल्याने तुनिशा ही तणावात होती. यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
नुकताच तुनिशाच्या काकांनी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा केला आहे. तुनिशाच्या काकांनी सांगितले की, लाॅकडाऊनमध्ये दीड वर्ष तुनिशा ही माझ्याकडेच होती. माझी मुलगी आणि तुनिशासोबत राहात होत्या.
मी आणि तुनिशा कायमच फोनवर देखील बोलत होतो. परंतू तिच्या आयुष्यामध्ये सध्या सुरू असलेल्या या घटनांबद्दल मला थोडीही कल्पना नव्हती. मुंबईमधील काही जवळच्या व्यक्तींकडून मला समजले की, ती तणावामध्ये होती.
तुनिशा हीने डाॅक्टर आणि तिच्या आईला सांगितले होते की, तिला धोका देण्यात आलाय आणि सध्या ती यामधून जात आहे. तिचे काका पुढे म्हणाले की, मला कोणालाही दोष अजिबात द्यायचा नाहीये.
या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा मिळेल. अशी अपेक्षा मला आहे. शीजान खानचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आता या प्रकरणातील सत्य लवकरच पुढे येईल.