लग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर…

| Updated on: Dec 09, 2022 | 9:49 PM

लग्नातील प्रत्येक विधीचा फोटो हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.

लग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर...
Follow us on

मुंबई : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे 2 डिसेंबरला लग्न बंधणात अडकले आहेत. अत्यंत थाटामाटात यांचा विवाह सोहळा हा पुण्यात पार पडलाय. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाची काही वेगळीच हवा ही सोशल मीडियावर सुरू होती. लग्नातील प्रत्येक विधीचा फोटो हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. इतकेच नव्हेतर लग्नामध्ये दोघांचा राॅयल लूक बघायला मिळाला. चाहते सुरूवातापासूनच यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. राॅयल पध्दतीने यांचा विवाह सोहळा पार पडला.

लग्न, उखाणा स्पर्धा, मेहंदी, हळद, रिसेप्शन हे सर्व काही स्पेशल अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी केले. रिसेप्शनमध्ये तर हार्दिक जोशी याने अक्षयासाठी खास डान्स देखील केला होता.

सोशल मीडियावर यांच्या लग्नाची पत्रिकाही तूफान व्हायरल झाली होती. मात्र, यांनी आपल्या लग्नाची तारीख ही कोणाला कळू दिली नव्हती. यांचे लग्न हे पुण्यात पार पडले.

नुकताच अक्षया देवधर हिने फेसबुकवर एक छोटासा व्हिडीओ शेअर केलाय आणि हा व्हिडीओ पाहून असा अंदाजा बांधला जातोय की, हे दोघे लग्नानंतर कुठेतरी स्पेशल ठिकाणी फिरायला गेले आहेत.

या व्हिडीओमध्ये फक्त अक्षया देवधर दिसत असून तिच्या मागे समुद्र दिसत आहे. यावेळी तिने सुंदर असा काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून अक्षयाचा लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.

चाहते सोशल मीडियावर अंदाजा बांधताना दिसत आहे की, लग्नानंतर हार्दिक आणि अक्षया कुठेतरी फिरायला गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षया हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.

अक्षया आणि हार्दिक हे दोघेही कॉफी डेटवर गेले होते. अक्षयाने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आता दिसत आहे. खयालो का शहर या गाण्यावरचा व्हिडीओ अक्षयाने शेअर केलाय.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधून खरी ओळख अक्षया आणि हार्दिकला मिळालीये. आजही अनेक लोक त्यांना राणादा आणि पाठकबाई या नावाने ओळखतात.